hot & cold

अंघोळीसाठी पाणी ‘गरम’ की थंड’?

नियमित अंघोळ करणं जितकं गरजेचं आहेत, तितकच आवश्यक आहे अंघोळीच्या पाण्याचं तापमान! कारण, या पाण्याच्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होतो कधी सकारात्मक, तर कधी नकारात्मक! कसा तेच जाणून घेऊया आजच्या लेखाद्वारे!

गरम पाणी –

सांधेदुखीवर गरम पाण्याने शेक देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. याचाच अर्थ गरम पाण्याने अंघोळ केल्याने सांधे किंवा अंगदुखीवर आराम मिळतो. तसेच, सर्दी होऊन कफ वैगरे झाल्यास श्वसनाचा होणारा त्रास गरम पाण्याने अंघोळ केल्याने दूर होतो. अंघोळीदरम्यान गरम वाफ आत बाहेर होत असल्याने नाक, घसा मोकळा होण्यास मदत होते. सर्वांत महत्तम असा फायदा म्हणजे, निद्रानाशावर आराम मिळतो. रात्री गरम पाण्याने अंघोळ करुन झोपल्यास छान तान्ह्या बाळासारखी ऊबदारशी शांत झोप लागते. स्वच्छतेबाबतही निश्चिंती मिळते. डोळ्यांना सहजी न दिसणारे शरीरावरील जीव जंतूंना पळवून लावण्यासाठी गरम पाणी उपयुक्त ठरते.

गरम पाणी इतके नानाच-हेचे फायदे देत असले, तरी कधीच कडकडीत गरम पाणी अंघोळीसाठी वापरु नये. कारण, गरम पाण्यामुळे त्वचेवरील छिद्रे प्रसरण वापलेली असल्याने. आतील त्वचेस थेट शेक मिळतो. कालांतराने त्वचा काळवंडते. अशा पाण्याने केस धुतल्यास केस गळण्याचे प्रमाण देखील वाढते. त्यामुळे, नियमित नाही, तरी अधून मधून हलक्याशा कोमट पाण्याने अंघोळ करण्यास प्राधान्य देण्यास हरकत नाही.

थंड पाणी

आरोग्यदायी फायद्यांबाबत थंड पाणी थोडं उजवं ठरताना दिसेल. वर्षभर नियमित थंड पाण्याने अंघोळ केल्यास त्वेचीतील पेशींना योग्यप्रकारे क्रियाशील होऊन रक्ताभिसरणाचे कार्य सुधारते. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच, त्वचा उजळ होऊन आपल्यालाही आतून ताजेतवाने वाटते आणि सर्वोत्तम फायदा म्हणजे थंड पाण्याने अंघोळ केल्यास वजन कमी होण्यासही मदत होते. हे अविश्वसनीय वाटेल, पण खरे आहे. मात्र, क्वचित थंड पाण्याने अंघोळ केल्यास सवय नसल्याने डोक जड होऊन सर्दी तापाचा त्रासही उद्भवू शकतो. त्यामुळे, थंड पाण्याने अंघोळ करणे सवयीचे होणे आवश्यक आहे.

आता, अंघोळीसाठी कुठल्या तापमानातील पाणी निवडायचे याची निवड तुमची तुम्हाला करायची आहे. तेही स्वत:चे शरीर स्वास्थ्य लक्षात घेऊनच!

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares