akshay tritiya (1)

अक्षय तृतीयेच्या दिवशी करावे हे ‘शुभकार्य’!

शुभ कार्याला आरंभ देणारी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया, वसंतोत्सव, चंदनयात्रा, आखिती, आख्यातिरी, अखतारी, दोलोत्सव अशा भरपूर नावांनी साजरा होणारा हा दिवस, सोने खरेदीचा उत्तम मुहूर्त मानला जातो. या दिवशी कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात केल्यास त्याची भरभराट होते अशी श्रद्धा आहे. सोनाराने घडविलेला दागिना लाखमोलाचा असला, तरी महाराष्ट्राचं अस्सल सोनं, तर काळ्या मातीतून उगवतं आणि दाणेदार सोन्याच्या घडणावळीचे संपूर्ण श्रेय शेतक-याच्या मेहनतीला जाते.
या दिवशी शहर सोन्याचा भाव पाहाते, तर गावाकडे शेतकरी शेतीच्या कामांसाठी हा शुभ दिवस साधतो. जमिनीत ढेकळे फोडून वाफे तयार करणे, जमिनीची भाजणी, सुपीक मातीसाठी राख किंवा गोबर मातीत मिसळणे, राखणीचे कुंपण तसेच शेतीचे अनेक महत्त्वाचे करार केले जातात. आळीकरुन फळ झाडांची पेरणी केली जाते. घरगुती उपचारांसाठी वापरल्या जाणा-या या औषधी वनस्पतींची रोपे लावली जातात.
गावाकडे झाडे जितकी लेकरावानी, तितकीच शहरासाठी शुद्ध हवा देणारी! सोने विकत घेण्याचा मुहूर्त साधताना, स्वस्त व मस्त असे झाड लावण्याचे काम करुया. फळांच्या बिया किंवा फुलझाडे, कडुलिंब, तुळस, सारख्या औषधी वनस्पती लावूया. ज्यामुळे, धनलक्ष्मीचा आशिर्वाद व वृक्षराजीचा सहवास दोन्हीचा अक्षय्य लाभ होईल!

More Articles
Designed and Developed by SocioSquares