grahak banner

अट्टहास ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा!

काळासोबत बदलण्याचा नियम ग्राहकांना लागू होतो, तसा विक्रेत्यांनाही. जगभर पसरलेल्या ग्राहक वर्गातून नमेक्या व लक्षीत ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानातील नव्या बदलांवर जाणीवपूर्वक  अभ्यास करायला हवा. व्यवसाय वृद्धिसाठी रोजच्यारोज नवनव्या अधिकाधिक ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठीच, पुढील मार्गांचा अवलंब करावा लागेल.

फेसबुक, ट्विटर इतकाच इस्टाग्रामवर ग्राहकांचा प्रतिसाद अधिक मिळायला लागलाय. व्हिडीओ अपलोडींग कुठल्याही साईटवर केले, तरी त्या व्हिडीओला मिळालेले अर्ध्याहून अधिक व्हूज हे मोबाईलवरुन मिळालेला असतात. यावरुन आपण लक्षात येते, की व्हिडीओज् वेगाने युजर्सपर्यंत पोहोचवणारे मोबाईल हे महत्त्वाचे माध्यम ठरतेय. म्हणून उत्पादनाची माहिती देणारी व्हिडीओरुपी जाहिरात बनवून ती सोशल मिडीआवर अपलोड करुन ग्राहकांना अकर्षित करण्यावर भर द्यायला हवा.

तसेच, सोशल मिडीआवरील अकाऊंट्स वा वेबसाईट्सद्वारे ग्राहकांच्या अडचणी लाईव्ह चॅटिंगच्या मदतीने कमीतकमी वेळात सोडवणे शक्य झालेय. तुम्ही तुमच्या व्यवसायात ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली नसेल, तर ताबडतोब सुरु करा. पापड, लोणची किंवा कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याच्या घरगुती व्यवसायास देखील याचा फायदा होऊ शकतो. घरबसल्या एका मॅसेजद्वारे ऑर्डर्स घेता येणे शक्य होईल.

सोशल मिडीआवर ठराविक किंमत भरुन व्यवसायाची जाहिरात लक्षीत ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते. तुमच्या व्यवसायाचा ग्राहक वर्ग स्त्री आहे की पुरुष? त्यांचे वय, भौगोलिक क्षेत्र असे घटक निश्चित करुन तितक्याच समूहापर्यंत जाहिरात प्रसिद्ध करता येते. त्याला अ‍ॅड प्रमोशन असेही म्हटले जाते. या पर्यायाचा देखील तुमच्या व्यवसायास छान फायदा होईल.

फोटो, व्हिडीओ, अ‍ॅडपलिकडे सोशल मिडीआवरील तुमच्या व्यवसायाचे पेज जास्तीतजास्त क्रियाशील ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सेवा स्विकारलेल्या किंवा उत्पादन खरेदी केलेल्या ग्राहकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांचे व्हिडीओ रेकॉर्डींग करुन, ते पेजेसवर पोस्ट करावेत. तसेच, कुठल्या ही प्रदर्शनात तुम्ही तुमच्या उत्पादनाचा स्टॉल लावल्यास त्याचे फोटोज, व्हिडीओज्, ऑफर्सची माहिती पेजवर अपलोड करावी. अशाप्रकारे, पेज अ‍ॅक्टिव्ह ठेवल्यास तुमचा व्यवसाया ग्राहकांच्या सतत नजरेस पडतो, ज्यामुळे तुमच्या उत्पादनाचा ग्राहकांना विसर पडत नाही. मात्र, याचा अतिरेकही होऊ देऊ नये. व्यवसायाची माहिती देण्यात नावीण्य असावे, पण पोस्ट अपलोड करण्याचा अतिरेक करु नये. फक्त एक-दोन पोस्ट सोशल मिडीआवर अपलोड करणे पुरेसे आहे.

या सगळ्यापलिकडे महिला व्यवसायिकांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या लाडक्या झी मराठी वाहिनीने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय, उपलब्ध करुन दिलयं एक हक्काचं व्यासपीठ www.homeminister.com या वेबसाईटवर आपला व्यवसाय रजिस्टर करायचा आहे. ज्यामुळे, एकाचवेळी जास्तीतजास्त ग्राहकवर्गापर्यंत उत्पादन पोहचू शकते. अधिक माहितीसाठी नक्की भेट द्या www.homeminister.com  या वेबसाईटला!!

टेक्नोलॉजीचे नवनवी रुपे आजमावत व्यवसायाचा परिघ वाढवण्याची हिच नामी संधी आहे. तुम्ही सुरु केलेला तुमचा व्यवसाय आता मोठ्ठं रुप घ्यायचं म्हणतोय, तर द्या त्याला साथ आणि यशस्वी महिला उद्योगिनींत आपले स्वतंत्र्य स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज व्हा!

More Articles
Designed and Developed by SocioSquares