tour safe (1)

एकटीनं प्रवास करताय, मग आधी हे वाचा!

भटकण्याची आवड असली, की कुठलेही निमित्त चालते. समर ट्रिप, मान्सून ट्रिप, विंटर ट्रिप, फॅमिली ट्रिप, ब्रेक फ्रॉम वर्क अशी भरपूर कारणं चालतात. त्यात, घरापासून दूर असेल, तर झटपट प्लॅन्स बनवता येतात. पण अनोळखी देशाला किंवा शहराला भेट द्यायची, तर मात्र थोडी जास्तीची तयारी ओघानेच येते. अशा ट्रिपवर ग्रुपने जात असू किंवा एकट्याने खालील मुद्दे विसरुन चालायचे नाही.

ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स:

पासपोर्ट अपडेट करणे गरजेचे आहे आणि प्रथमच देशाबाहेर प्रवास करत असाल, तर पासपोर्ट काढण्यापासूनची प्रक्रिया नीट समजून घ्यायला हवी.

प्रवास:

घरातून निघाल्यावर प्रथम टॅक्सी किंवा ट्रेन, मग प्लेन, पुढे इच्छित ठिकाणी लॅंड झाल्यावर हॉटेल पर्यंत जाण्यासाठी टॅक्सी करावी लागते, किंवा काही हॉटेल्स पिकअपची सेवा देतात. त्याची विचारपूस आठवणीने करावी. टूरीस्ट पाहून कॅबवाले अवाच्यासवा भाडी घेतात. त्यापासून वाचावे.

भाषेची ओळख:

तिथल्या भाषेची तोंडओळख असावी. हॅलो, प्लीज, सॉरी अशा किमान शब्दांचा सराव केल्यास तेथील  दुकानदार, स्थानिक मंडळींच्या आदरातिथ्याला नीट सामोरे जाता येईल.

कागदी नकाशा:

मोबाईलमध्ये एका क्लिकवलर गुगल मॅप असतानाही नव्या देशाचा किंवा शहराचा कागदी नकाशाही सोबत बाळगावा. बरेचदा नव्या ठिकाणी मोबाईलला इंटरनेटचे कनेक्शन नीट मिळत नाही किंवा बॅटरी लो होऊन मोबाईल स्विच ऑफ होण्याची शक्यता असते. त्यामुळे, कागदी नकाशा बॅगेत असू द्यावा.

रिझर्वेशन:

पाकीटात जास्तीची रक्कम न ठेवता, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, शॉपिंग कार्ड अशा प्लॅस्टिक मनीचा वापर करत, आपण कॅशलेस व्यवहारावर भर देऊ लागलोयत. तेव्हा, परदेशी प्रवास करतानाही हाच फंडा ध्यानात ठेवायचाय आणि त्यांच्या देशातील चलन वापरताना, सोबत पुरेशी रोख रक्कम बाळगावी, पण जास्तीतजास्त व्यवहार प्लॅस्टिक मनीच्या सहाय्याने करावेत.

रिसर्च व अपडेट्स:

ट्रिपमधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे, साईड सीन्स पाहाणे. पण, त्या
ऐवजी तेथीवल संस्कृती, परंपरा, लोकांचे राहणीमान जवळून अनुभवण्यासाठी त्या शहरातील फेस्टिवल्स, विकेंड इव्हेंट्सविषयीची माहिती आठवणीने गोळा करा. इंटरनेटवर शोधल्यास अशा आकर्षक सोहळ्यांविषयी नक्की माहिती मिळेल.

मग, कधी करताय परदेश वारी? नक्की प्लॅन करा. भरपूर फिरा. जमल्यास एकटीनं एखाद्या अनोळखी शहराला जरुर भेट द्या. फॅमिली पिकनिक धम्माल असतेच, पण स्वत:सोबत वेळ घालवायचा तर एकटीनं प्रवास करुन पाहायला हवा. कारण, ‘केल्याने देशाटन, मनुजा येते शहाणपण’.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares