Umbrella Art (2)

अशी करावी छत्रीवर कलाकुसर…

रेनकोट, सॅण्डल, छत्री अशा पावसाळी शॉपिंगच्या गडबडीत असाल, तर यंदा छत्री घेताना एक फिकट रंगाची, कुठलेही डिझाईन नसलेली छत्री आठवणीने विकत घ्या आणि नेहमीपेक्षा थोड्या निराळ्या त-हेने पावसाळा सेलिब्रेट करण्यासाठी तयार व्हा.

Umbrella Painting (1)

घरच्याघरी छत्रीवर हवे ते डिझाईन रंगवणे अवघड मुळीच नाही. प्रथम वरीलप्रमाणे, एखादी छत्री निवडा. छत्रीचा रंग गडद असल्यास थोडे विचारपूर्वक डिझाईन निवडावे लागते आणि फिकट रंगाच्या छत्रीवर बहुतेक सर्व रंग उठून दिसतात. त्यामुळे, डिझाईन निवडणे थोडे सोप्पे जाते. म्हणून शक्यतो छत्रीचा रंग फिकट असावा.

त्यानंतर, छत्रीच्या कापडावर रंगवण्यासाठी ऍक्रेलिक पेन्ट्सच वापरावेत. तेच ऊन-पाऊस झेलून व्यवस्थित टिकतील. तसेच, पेन्सिल, वॉटरप्रुफ मार्कर, लहान मोठ्या आकारातील ब्रश व पांढरी टेप, इस्त्री, असे साहित्य लागेल.

 

  1. आधी, पेन्सिलच्या सहाय्याने छत्रीवर डिझाईन रेखाटून घ्यावे.
  2. हे डिझाईन पूर्ण झाल्यानंतर, वॉटरप्रुफ मार्करने ते गडद करावे.
  3. तयार डिझाईन ऍक्रेलिक पेन्टने रंगवावे.
  4. ते व्यवस्थित सुकू द्यावे व छत्री कापडावर ते पक्के बसावे यासाठी त्यावर हलकी इस्त्री फिरवावी.
  5. छत्रीचे कापड नाजूक असते, हे ध्यानात घेऊन इस्त्रीचे तापमान ठेवावे.

Umbrella Painting (3)

अशाप्रकारे, धम्माल रंगांचा मेळ साधत, स्वत:ची कस्टमाईझ्ड छत्री तयार करता येईल. लहान मुलांसाठी शाळा सुरु होण्यापुर्वीचा सुट्टीच्या उरलेल्या दिवसांसाठी छोटासा विरंगुळा म्हणून Umbrella painting छान पर्याय आहेच, पण कलाकुसरीबाबत हौशी असणारी घरातील इतर मंडळीही या एक्टिव्हीटीची मज्जा लुटतील या शंकाच नाही.

Image-pinterest

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares