aambha (1)

आंब्याच्या झटपट रेसिपीज!

यंदाच्या उन्हाळ्यात आंब्याच्या या हटके रेसिपीज करण्यासाठी आहात ना तयार? लहान मुलांपासून सारेच या चवदार रेसिपीजना पसंतीची पावती देतील. करुन तर पाहा!

मॅंगो मफिन्स –

साहित्य – १ कप मैदा, १/२ कप आंब्याचा गर, १/२ कप कन्डेन्स्ड मिल्क, १/३ कप पिठी साखर, १/२ कप दूध, १/३ कप बटर, १/२ लहान चमचा वाटलेली वेलची, १/४ लहान चमचा मीठ, १/४ लहान चमचा बोकिंग सोडा, १ लहान चमचा बेकिंग पावडर

पाककृती –

 • प्रथम मफिन ट्रे व मफिन कप्सला तेल लावावे.
 • मैदा, मीठ, बेकिंग सोडा व बेकिंग पावडर एकत्र करुन दोन वेळा मिश्रण नीट चाळून घ्यावे.
 • बटर किंवा कन्डेन्स्ड मिल्क आंब्याच्या पल्पमध्ये मिळसून मिश्रण फेटून घ्यावे.
 • या मिश्रणात थोडे थोडे तेल घालून फेटल्यास बॅटर व्यवस्थित फेटले जाते.
 • तयार बॅटर चमच्याने मफिन कप्समध्ये भरावे.
 • ओव्हन १८० डिग्री.से.वर प्रिहिट करुन घ्यावा. त्यामध्ये, मफिन बेक करण्याकरिता ट्रे ओव्हनमध्ये ठेवावा. साधारण २० मिनिटे बेक करावे. मफिन्स हलकेसे तपकिरी रंगाचे झालेले दिसतील.
 • तयार मॅंगो मफिन्स गार झाल्यावर मोल्ड मधून काढून प्लेटमध्ये चॉकलेट सॉसने गार्निश करुन सर्व्ह करावेत.

मॅंगो मोहितो –

साहित्य- २ गोड हापूस आंबे, १ हिरवी मिरची, ५ ते ६ पुदिन्याची पाने, १/२ वाटी साखरेचा पाक, बर्फाचा चुरा, सोडा वॉटर

पाककृती –

 • आंब्याच्या साले काढून त्याच्या बारीक तुकडे करुन घ्याव्यात. त्यापैकी १० ते १२ तुकडे गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवावे.
 • हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करावेत. साखरेचा पाक, हिरवी मिरची, आंब्याचे तुकडे, पुदिन्याची पाने सारे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्यावेत. मिश्रण आंब्याचा गर दिसेल इतपत बारीक करावे.
 • आता, ग्लासमध्ये थोडा बर्फाचा चुरा, आंब्याचे मिश्रण व सोडा वॉटर घालावे.
 • त्यावर ३ ते ४ आंब्याच्या बारीक फोडी, २ ते ३ पुदिन्याची पाने घालून मॅंगो मोहितो छान गार्निश करावे आणि गारेगार सर्व्ह करावे.

मॅंगो मॅच स्मूदी –

साहित्य – २ संफरचंद, १ केळे, १ वाटी गोड दही, २ चमचे आंब्याचा गर, १/४ वाटी भिजवलेले किसमिस, बदामाचे काप व चेरी

 • पाककृती – सफरचंदाचे तुकडे, केळ्याचे तुकडे, आंब्याच गर, दही, भिजवलेले किसमिस हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये एकजीव करुन घ्यावेत. तयार मिश्रण ग्सासमध्ये ओतून त्यावर बदामाचे काप व चेरी लावून सजवावे.

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares