mom banner

आईची तान्ह्यासाठी ‘मातृत्व रजा’!

शाळा, महाविद्यालयानंतर विविध क्षेत्रांत उच्चशिक्षण घेऊन घराचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी व स्वविकासासाठी घराचा उंबरठा ओलांडणारी ‘स्त्री’ नोकरदार व कमावती बनली. पुरुषांच्या जोडीने, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ‘ती’, अशी जिच्या सक्षमतेची स्तुतीसुमने गायली गेली तिच्या यशाने आता आणखी भव्य रुप धारण केले आहे. पुरुषांशी तुलना करीत तिच्या प्रगतीची दखल घेणारे मोजमाप आता मागे पडले असून मेरीट लिस्ट, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षांतील मुलींची वाढती संख्या, तसेच सरकारी नोकरीपासून, उद्योग जग व परदेशी संस्थांपर्यंत विविध स्तरावर कार्यरत असणा-या बहुसंख्य महिला ‘स्त्री’च्या स्वतंत्र्य असित्त्वाचे नेतृत्व करतात.

स्वबळावर आर्थिक सुबत्ता मिळवताना दैवाने तिच्याकडे सोपवलेले ‘आई’ हे उच्चतम पदही तितक्याच विश्वासाने ती जपते आहे. गरोदर काळात नाजूक अवस्थेतून जाणा-या महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. अशीवेळी, सुरु असलेली नोकरी व बाळाचे संगोपन याचे योग्य संतुलन साधावे लागते.

देशातील सरकारी क्षेत्रात नोकरी करणा-या महिलांना ‘सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस(लीव्ह) रुल्स १९७२’ नुसार सहा महिन्यांच्या मातृत्व रजाबाबत मिळणारा अधिकचा दिलासा, आता खाजगी क्षेत्रांतील महिलांनाही मिळणार हा नियम भावी आई वर्गासाठी नक्कीच सुखदायक आहे. यापूर्वी गरोदर महिलांना १२ आठवडे रजा मिळत असे, आता नवीन नियमानुसार दोन मुलांसाठी २६ आठवडे व तिस-या किंवा चौथ्या मुलासाठी १२ आठवडे रजा घेता येणारा आहे. कॅनडा व नॉर्वेनंतर गरोदर महिलांना सर्वाधिक पगारी रजा देणारा भारत जगातील तिस-या क्रमांकाचा देश ठरला आहे.

६ महिन्यांची पगारी रजा व त्यामुळे होणारा कामाचा खोळंबा असा दृष्टिकोन ठेवत जर संस्थांनी कंपनीचा नफा तोटा विचारात घेतला आणि हुषार कर्मचारी असूनही महिला आहे म्हणून नोकरी देणे टाळले तर! मैत्रिणींनो, अशी भिती वाटून घेण्याचे कारण नाही. या नव्या नियमाला खाजगी कंपन्यांची स्वागतार्हता नक्कीच मिळेल, कारण कठीण परिस्थितीला शरण न जाता, बुद्धिमत्तेच्या जोरावर वेळोवेळी स्त्रीयांनी स्वत:ची क्षमता सिद्ध केली आहे, याच गुणांच्या जोरावर महिला विभिन्न क्षेत्रात अग्रणी ठरल्या आहेत. स्पर्धात्मक जगात टिकून रहाण्यासाठी संस्थांना हवे असतात प्रामाणिक व मेहनती कर्मचारी, खाजगी कंपन्याही स्त्री किंवा पुरुष यापेक्षा मेहनतीला प्राधान्य देतील आणि गरोदर महिलेच्या २६ आठवड्याच्या रजेनंतर तिला पुन्हा कामावर तितक्याच आदराने रुजू केले जाईल, यात शंका नाही!
he

More Articles
Designed and Developed by SocioSquares