carry b

आणि ‘त्या’ पुन्हा दिसू लागल्या!

पर्यावरणाच्या हितार्थ प्लॅस्टिक पिशव्यांवर घातलेली बंदी निसर्गप्रेमींनी उचलून धरली, तर बाकींनी होणा-या गैरसोयीची कारणे पुढे केली. प्लॅस्टिकच्या पिशव्यांसोबत या बंदीत प्लस्टिकच्या कुठल्या वस्तू बॅन केल्यात किंवा वगळल्यात याविषयीची माहिती देखील सोशल मिडिआ, वर्तमानपत्रांतून सर्वांपर्यंत पोहोचत होती. बंदीचं उल्लंघन करण्यांकडून दंड आकारले जात होते, त्याची चर्चा होत होती. तर ब-याच संस्था कापडी पिशव्यांचे वाटप करत त्यांच्या वापराविषयी जनजागृती करीत होत्या.

मात्र अवघ्या काही महिन्यांत ही बंदी थोडी शिथील झाल्यासारखे वाटू लागलेय. कारण, प्लॅस्टिक पिशव्या पुन्हा नजरेस पडू लागल्यात. अनेक भाजीवाले ग्राहकाला सर्रास प्लॅस्टिक पिशव्या देऊ लागलेत. बाटलीत दूध भरुन देण्याची किंवा कागदामध्ये मांस, मच्छी गुंडाळून देण्याची पर्यावरदायी सवय अवघी काही दिवस टिकली आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

तरीही या बंदी अंती काहीच साध्य झाले नाही, असेही म्हणता येणार नाही. ब-याचशा दुकानांतून सरकारमान्य विघटनशील अशा प्लॅस्टिक पिशव्या दिसू लागल्यात. त्या जाड व अधिक पारदर्शक आहेत. मॉल, सुपर मार्केट किंवा तत्सम ब्रॅण्डेड दुकानांमध्ये कापडी किंवा कागदी पिशव्या दिल्या जातायत. त्यामागे पैसे आकारले जात असले. तरी ग्राहकाकडे पिशवी नसल्यास त्याला प्लॅस्टिक पिशवी देण्यापेक्षा, थोड्या जास्त भावात कापडी नाहितर कागदी पिशवी देण्याचा निर्णय नक्कीच पर्यावरणदायी आहे.

शॉपिंग, बाजारहाट या दोन प्रमुख कारणांनी रोजच्यारोज नवनव्या पिशव्या घरात येतात आणि ही दोन्ही विभाग बरेचदा घरातील महिलेच्या अखत्यारित येत असल्याने, मैत्रिणींनो प्लॅस्टिक पिशव्यांचे घरात येणे आपणच कटाक्षाने रोखू शकतो.

लागू केलेल्या बंदीचे पुढे काहीही होवो. पण, मागच्या लेखात आपण प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्याचा केलेला संकल्प तसाच कायम ठेवूया. घरातून बाहेर पडताना अडीनडीला लागेल या हेतूने एक कापडी पिशवी बॅगेत असू द्यावी. म्हणजे ऐनवेळी कापडी पिशवी विकत घेण्याचा खर्च टळतो आणि प्लॅस्टिक पिशवीचा कचराही. गर्दीत, सार्वजनिक ठिकाणी तसेच, मंदिर, वाचानलाय अशा शांततेच्या ठिकाणी देखील प्लॅस्टिक पिशव्यांचा प्रकर्षाने जाणवणारा कुरकूर आवाज आता हलके हलके कमी होऊ लागलाय, इतकाही बदल स्वागतार्ह आहेच. बहुतांश वयस्कर मंडळी वर्षानुवर्ष कापडीच पिशव्या वापरताना दिसतात. आता, तरुणांनीही हिच परंपरा कायम ठेवायचीय, म्हणजे पुन्हा बंदीची गरजचं नाही. काय पटतंय ना…?? तुम्ही कापडी पिशव्या वापरण्याचा ‘निश्चय’ सोडलेला नाही ना..?

या विषयावरील तुमचे मत लिहा लेखाखालील कमेन्टबॉक्स मध्ये,

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares