apps banner

आपल्याला मिळणार अॅपची साथ !

आपले वेगवान आयुष्य सुखकर करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे अॅप्स उपयोगी पडू शकतात. आजकाल स्मार्ट फोन सगळ्यांकडेच असतात तेव्हा त्याचा उपयोग देखील स्मार्टपणे व्हायला पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. व्हॉट्स अॅप, फेसबुक, स्काइप यांचा वापर बऱ्याच स्त्रिया करतात, पण रोजच्या रुटीनमध्ये इतरही अॅप्स महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यातील काही अॅप्स :.

CookWizMe :
आज स्वयंपाक काय करायचा हा प्रश्न कामावर जाणाऱ्या किंवा गृहिणीला रोज पडणारा प्रश्न असतो. या रोजच्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी CookWizMe अॅपचा उपयोग होऊ शकतो . या अॅपमार्फत तुम्हाला नवीन रेसिपी आणि त्याबद्दलची माहिती देखील मिळू शकते. तुम्ही आयफोन वापरत असाल तर हे अॅप तुम्ही वापरू शकता.

Nike training club :
या अॅपमध्ये १०० वेगवेगळे पर्याय आहेत. ज्यातून तुम्हाला फिटनेस संबंधी सूचना आणि मार्गदर्शन केले जाते तसेच यातून आपण कॅलरी देखील तपासू शकता. या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे Nike Master चे प्रशिक्षक आणि मारिआ शारापोआ सारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंचे या अॅपमध्ये योगदान आहे. Android फोन मध्ये हे अॅप आपल्याला उपलब्ध होऊ शकेल.

Mother’s World :
हे अॅप प्रेग्नसीच्या काळात बाळ आणि बाळाच्या आईच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. या अॅपद्वारे तुम्हाला वैयक्तिक प्रेग्नसी बाबत देखील माहिती मिळू शकते. समाविष्ट केलेली माहिती वैद्यकीय तज्ञांद्वारे मान्यता प्राप्त असते. Android फोन मध्ये हे अॅप आपल्याला उपलब्ध होऊ शकेल.

SOS stay safe :
वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीने हे अॅप उपयोगी पडू शकते. या अॅप मार्फत तुमच्या इमर्जन्सी नंबरला तात्काळ एसएमएस आणि / किंवा इमेल तसेच १ मिनिटाचे व्हॉइस रेकोर्डिंग, तुम्ही कुठे आहात त्याची माहिती आणि फोन बॅटरीची स्थिती अशी माहिती पाठवली जाते. यासाठी फक्त तुमचा फोन हलवून तुमची माहिती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकता.

अशा प्रकारच्या अॅपचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता.

More Articles
Designed and Developed by SocioSquares