Interview BANNER

इंटरव्यूला जाताना ड्रेसिंग असावे असे!

शाळेची कित्येक वर्ष पुढे महाविद्यालयीन उच्चशिक्षणाचा खटाटोप सारं काही भविष्यात व्यवस्थित करिअर व्हावं, योग्यशी नोकरी लागावी हे इस्पित नजरेसमोर ठेवूनच करतो. अशा कित्येक वर्षाच्या तपश्चर्येचे फळ म्हणजेच मिळालेली इंटरव्हूची संधी, अशा संधीला कपड्यांत तारतम्य नसण्याच्या कारणाने हातची जाऊ द्यायची नाही का? मुळीच नाही. म्हणूनच, इंटरव्हूला जाताना पेहराव अचूक हवा. त्यात एकही चूक नसावी यासाठीच घेऊन आलोय आजचा लेख, लक्षपूर्वक वाचा बरं…

ट्राऊजर किंवा स्कर्टवर शर्ट, पंजाबी ड्रेस, कुर्ती लेगिंन्स, साडी असे प्रकार फॉर्मल्समध्ये मोडतात. यापैकी, आवडीनुसार व वावरायला सोयीस्कर वाटेल ते निवडावे. शॉर्ट स्कर्ट्स दिसायला छान दिसत असेल, तरी त्यांची उंची किमान गुडघ्यापर्यंत असावी. कमी उंचीच्या स्कर्टमुळे चालताना अडचण येत नाही, पण बसल्यावर स्कर्ट वर चढल्याने चारचौघात अवघडल्यासारखे होते.

कपडे स्वच्छ व व्यवस्थित इस्त्री केलेले असावेत. कपड्यांचे रंग मुख्यत्वे फिकट असावेत, नजरेत भरणारे गडद रंग टाळावेत.

बरेचदा इंटरव्हू म्हटला, की नवे कोरे कपडे घातले जातात. ही सवय चांगली आहे, पण नव्या कपड्यांवरील प्राईज टॅग, स्टिकर्स आठवणीने काढावेत. नाहीतर टॅग्स कपड्याबाहेर लटकत राहतील  आणि तुम्ही शॉपिंग केल्याचं इंटरव्हू घेणा-यालाही समजेल.

केस मोकळे सोडू नयेत, त्यापेक्षा छानशी हेअर स्टाईल करावी. त्यासाठी पुढील लिंकवर दिलेल्या ऑफिस हेअर स्टाईल्स मार्गदर्शक ठरतील 👉 https://goo.gl/uWepHP

इंटरव्हूला जाताना कॉलेजच्या मुलामुलींसारखी बॅग पॅक किंवा पर्स नेण्यापेक्षा ब्रिफकेस वापरणे अधिक सोयीचे ठरेल. प्रवासात किंवा गर्दीशी दोन हात करताना बॅग पॅक सोयीस्कर पडत असली, तरी ब्रिफकेसने तुमच्या फॉर्मल ड्रेसिंगला छान लूक मिळतो.

घाईघाईत सनग्लासेस डोक्यावर किंवा इअरफोन्स गळ्याभोवती राहून जातात. तेव्हा, इच्छित ठिकणी पोहोचताच असे साहित्य आठवणीने बॅगमध्ये ठेवावे.

कमीतकमी व नेमका मेकअप करण्यावर भर द्यावा. जास्तीतजास्त सुंदर दिसण्याच्या नादात केलेला अधिकचा मेकअप फार भडक दिसतो. तेव्हा फांऊडेशन, लिपस्टिक, आयलायनर इतक्यातही चेहरा छान खुलून दिसेल.

बोटांत भरपूर अंगठ्या, मोठे कानातले किंवा इतर कुठल्याही प्रकारचे दागिने घालून इंटरव्हूला जाणे टाळावे. त्याऐवजी बोटात एखादी रिंग, लहानशे मोत्याचे कानातले व गळ्यात नाजूकशी चेन घालणे उत्तम.

सध्या गोंदवलेले टॅटू फॅशनचा महत्तम भाग बनले असले, तरी इंटरव्हूला जाताना शक्यतो हे टॅटू कुणाच्याही सहज नजरेला पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.

तुम्ही गुणकौशल्याच्या बळावर इंटरव्हूची संधी स्वत:कडे खेचून आणालच, तेव्हा इंटरव्हूला जाताना योग्य पेहराव केला की झाले. मात्र, बाह्य सौंदर्य खुलविणा-या इतर बाबींमधील मोजकेपणा जपा आणि आत्मविश्वासाने नोकरीची संधी स्वत:च्या नावे करा.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares