indoor garden banner

इनडोअर बागेत लावावीत ‘ही’ झाडे!

घराच्या भोवताली पहुडलेली बाग, आता क्वचितच पाहायला मिळते. मोठ्ठाल्या इमारतींच्या आवारात थोडे बहुत बागकाम केलेले दिसतेही, मात्र त्याची सर वैयक्तिक बागेस नाही. स्वत:च्या देघरेघीखाली बहरलेल्या लहानशा रोपांची मौज काही औरच असते. जागेच्या अडचणींवर मात करत हल्ली कमी जागा व्यापणारे ‘इनडोअर गार्डन’ शहरी खोल्यांमधून बहरु लागले आहे. मर्यादित वाढ असणा-या या शोभेच्या झाडांचा व्यापही फार नसतो. व्यस्त दिनक्रमामुळे दररोज त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, तरी त्या बिचा-या झाडांची काही तक्रार नसते. अशा इनडोअर गार्डनसाठी पुढील झाडे निवडता येतील.

 

  • ऍन्थुरियम – या वनस्पतीच्या फुलांचा ह्ददयाकृती आकार, लालभडक रंग व मध्यावर पिवळसर कोवळा देढ आकर्षक दिसतो. ही फुले झाडावर २० ते २२ दिवस छान टवटवीत रहातात किंवा देठासहित खुडून फुलदाणीत ठेवली, तरी १० ते १२ दिवस टिकतात. ही फुले वर्षभर फुलत असून, या झाडाच्या मुळांजवळ हवा खेळती रहाणे गरजेचे आहे.

1

 

  • ट्रॅंगल हार्ट्स – लहानशा बदामी आकाराच्या पानांचे वेल असणारी ही वनस्पती भरघोस वाढते. सूर्यप्रकाशात ती अधिक टवटवीत होत असून, हॅंगिंग बास्केटमध्ये छान शोभून दिसते.

2

 

  • ड्रेसेना प्लांट– लांब निमुळती पाने, त्यांवर पिवळ्या व हिरव्या रंगाच्या रेषा व छान उंच वाढणारी ड्रेसेने प्लांट! पाण्याच्या प्रमाणाचे योग्य संतुलन साधून, या वनस्पतीच्या कुंडीतील माती साधारण ओलसर राहील याची काळजी घ्यावी.

3

 

  • ऍल्युमिनिअम प्लांट – हिरव्यागर्द आखूड पानांवर पिवळट पांढ-या पट्यांनी सजलेली ही वनस्पती छान उंच वाढते. मात्र, इनडोअर बागेत या वनस्पतीला जास्त वाढू देऊ नये, सतत छाटत राहून व्यवस्थित पसरट आकार द्यावा.

4

 

  • डायफेनबेकिया व ऍग्लोनेमा – या वनस्पतीच्या पानांवर अनेक प्रकारचे ठिपके असतात. यामध्ये रंगांची सरमिसळही दिसून येते. त्यावरील आकर्षक डिझाईन्स लक्ष वेधून घेतात. घरातील दमट वातावरणात ही वनस्पती छान सामावली जाते.

5

 

घराला गॅलरी नसली किंवा घराच्या खिडकीत कुंड्या ठेवण्याचा पर्याय उपलब्ध नसेल तर हिरमुसून न जाता, झाडांना थेट विविध खोल्यांमध्ये स्थान द्या. खोट्या प्लॅस्टिकच्या रंगीतसंगीत झाडांपेक्षा, ख-याखु-या झाडापानांचा सजीव सहवास आल्हाददायक वाटतो. अशावेळी खोलीच्या एखाद्या कोप-यात बसलेले रोपटेही, संपूर्ण खोलीची शोभा वाढवते आणि त्याची देखरेख करण्यात आपलेही मन रमते.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares