jouese (1)

उच्चशिक्षित गृहिणी!

‘ती’ घर सांभाळते म्हणून घरातील इतर सदस्यांना आपापली प्रगती करण्याची संधी मिळते किंवा त्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, पण यात शिकल्या सवरल्या तिच्या यशाची चढाई मात्र खुंटत जाते. आधी तिचा लढा होता शिक्षणासाठी आणि आता घेतल्या शिक्षणाला अचूक ज्ञान देण्याची धडपड सुरु आहे. शालांतं परिक्षा, महाविद्यालयीन वा स्पर्धा परिक्षा इतर कला, क्रिडा प्रकारामंध्येही मुलांपेक्षा मुलीच हल्ली वरचढ ठरत आहेत. स्त्री कार्यरत नाही, असे एखादेच क्षेत्र शिल्लक असेल कदाचित, तिही शक्यता कमीच आहे. पुरुषांच्या तोडीसतोड कामगिरी करण्याची धमक असणा-या या उच्चशिक्षित स्त्रियांना नोकरीशिवाय घरी का बरं बसावं लागतं?

तिच्या यशाच्या मार्गावर बुरसटल्या विचारांची बेरी फार पुर्वीपासून पसरलेली दिसते. “नवरा कमवतोय, मग तुला काय नोकरीची गरज!”, “आई घरी असली, म्हणजे मुलांवर चांगले संस्कार होतात.”, चूल, मुल व कुळ सांभाळण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजे घरची ‘स्त्री’! त्यामुळे, माहेरी हसत खेळत शिक्षण होतं, पण सासरी तिच्या करिअरला तितक्या गंभीरपणे घेतलं जात नाही. या अनुभवातून ज्या मैत्रिणींना जावे लागले नसेल, त्यांच्यासारख्या सुदैवी त्याच!

ह्या कौटुंबिक अडथळ्यांना एकवेळ दूर करता येईलही, कसं ते जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील लेख वाचा- http://zeemarathijagruti.com  मात्र याहून कठीण आहे ते सामाजिक समस्यांवर मात करणं. इतक्या वर्षानंतरही स्त्री पुरुष समानता व्यवसायिक जगात आपले पाय घट्ट रोवून आहे. एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाअंती दिसून आलं, की समान पदव्यांसह समान पदावर कार्यरत असणा-या महिलांचा पगार पुरुषांच्या तुलनेत साधारण २७% इतका कमी आहे.

तितकाच बुद्ध्यांकं, तितकीच कष्ट करण्याची तयारी असूनही साक्षर समाज साध्या वेतनात स्त्री पुरुष समानता राखू शकत नाही, तिथे विचारांतून प्रगट होणा-या असंतुलित समानतेचे करायचे काय? स्त्रिया बाळंतपणासाठी रजा घेतात, मुलांची देखभाल, त्यांच्या परिक्षांच्या काळात त्या सुट्ट्या घेतात, उशीरापर्यंत त्या ऑफीसमध्ये काम करु शकत नाहीत, त्यासाठी कार्यालयालाच पिकअप-ड्रॉप सर्व्हिस द्यावी लागते. अशा तत्सम कारणांचा कामावर परिणाम होतो म्हणत, ब-याचदा महिलांना उच्च पदापासून दूर ठेवलं जातं किंवा कुठल्याही पदावर स्त्री कर्मचारी नियुक्त करण्यास टाळाटाळ केली जाते.

सरकारी कार्यालये वगळता, खाजगी कार्यालयांत महिलांना अशी दुय्यम वागणूक देण्याचे प्रमाण आजही भरपूर असल्यानं, बहुतांश स्त्रियांना नोकरी न मिळाल्याने पूर्णवेळ गृहिणीची भूमिका स्विकारणे भाग पडते आहे. घराची जबाबदारी ती यशस्वीरित्या पार पाडते आहे, पण सोबत तिच्याजवळील कलागुणांना अचूक न्याय मिळाल्यास हाच आनंद द्विगुणीत होईल, यात शंका नाही.

मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं याविषयी? तुम्हाला असे काही अनुभव आले असतील तर तेही जरुर लिहा खालील comment box मध्ये,

More Articles
Designed and Developed by SocioSquares