Budget trip banner

उन्हाळयातील बजेट ट्रीपचे व्यवस्थापन…

बदलत्या ऋतुनुसार जर आपल्या मनात कुठे फिरायला जायचा विचार आला तर ते अगदी स्वाभाविकच आहे. रोजच्या रूटीन मधून जर आपल्याला थोड़ासा ब्रेक हवा असेल तर एखादया वीकेंड ला आपण प्रवासाला जाऊ शकतो. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळी नवीन ठिकाणे माहित पडतात. पण हे सगळं करत असताना कमीत कमी खर्चात आपल्या प्रवासाचे नियोजन कसे करावे याची माहिती करून घेऊयात.

आजच्या आपल्या तरुण पीढ़ीचा ही जास्तीत जास्त फिरण्यावर भर असतो तसेच नवनवीन ठिकाणे त्यांना खुणावत असतात पण तिथे जाण्यायेण्यासाठी लागणारा वेळ, राहण्या-जेवणाची व्यवस्था आणि खर्च आणि आपलं एकूण बजेट यात हे सगळ बसवता येईल असे अनेक प्रश्न त्यांना भेड़सावत असतात. अशा वेळी काही जण हे एकटे तर काही जण हे समूहाने फिरण पसंत करतात. जेणेकरून आलेला एकत्रित खर्च समान भागात विभागला जाईल आणि एकत्र समुहाने भ्रमंती केली तर एकमेकांना सोबत सुध्दा होते.

जर आपल्याला नवीन ठिकाणी फिरायला जायच असेल तर आधी त्याची थोड़ी पूर्वतयारी तसेच आधी त्या ठिकाणाला भेट दिलेल्या लोकांकडून त्या ठिकाणाची थोड़ी जुजबी माहिती घेणे हे अत्यंत उपयुक्त ठरते. कारण ही माहिती जर आपण नीट घेतली नाही तर अर्धवट माहितीने त्या ठिकाणी जाऊन कदाचित आपली निराशा होण्याची शक्यता असते. कुठल्या ऋतुमध्ये कुठल्या ठिकाणी जाता येईल याची माहिती असली की तशा पध्दतीने आपण आपली तयारी करू शकतो. समजा आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण तसेच कोणी नातेवाईक त्या ठिकाणी अगोदर जाऊन आलेला असेल किंवा तिथे कोणी ओळखीतली व्यक्ती जर तिथे राहत असेल तर आपली राहण्याची व्यवस्था उत्तम होऊ शकते.

उन्हाळ्यात गरमी प्रचंड असते त्यामुळे थंड होण्यासाठी तुम्ही एखादया वॉटर पार्क ला भेट देऊ शकता. थोडेसे पैसे भरले कि एका दिवसात तुमच्या करमणुकीची तसेच जेवण्या-खाण्याची व्यवस्था होते किंवा एखादया थंड ठिकाणी किंवा कोकणात जिथे उन्हाळा फारसा बाधत नाही अशा ठिकाणी तुम्ही नक्कीच जाऊ शकता, ओळख असेल तर अत्यंत कमी खर्चात तुमच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था अगदी घरगुती पध्दतीने होऊ शकते.  पावसाळ्यात आपल्या जवळच्याच एखादया धबधब्यावर तुम्ही भिजायला जाऊ शकता. जायचा-यायचा खर्च सोडला तर तेथील पाणी हे मुफ्त आणि नैसर्गिक असल्याने अत्यंत कमी बजेट मध्ये तुमचा हा एकदिवसीय भ्रमंतीचा आराखडा यशस्वी होऊ शकतो. पावसाळ्यात तसेच हिवाळ्यात एकत्र ट्रेकला जाणारे बरेच गृप सध्या कार्यरत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून अत्यंत कमी खर्चात तुम्ही तुमची ट्रेकिंगची तसेच रहिवासी ट्रेकिंग असेल तर तंबूत राहण्याची हाऊस पूर्ण करू शकता.

More Articles
Designed and Developed by SocioSquares