VEG (1)

उन्हाळ्यात आहारात ‘असे’ बदल करा…

वाढत्या उष्णतेमुळे हैराण होऊन एसी, फॅन, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, बर्फाचा गोळा, थंड पाण्यात अंघोळ असे उपाय सुरु करतात. गरमीपासून वाचण्याच्या या पद्धतींमुळे तात्पुरता बरे वाटले, तरी सर्दी, कफ, खोकला, ताप अशा आजारांना सामोरे जावे लागते. यासाठीच वरील उपायांसोबत शरीराचे योग्य संतुलन राखण्यासाठी पोषक आहार घ्यायला हवा.

• सकाळी उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाणी प्यावे व दिवसाची सुरुवात करावी.

• सकाळी दूध पिणे पसंत करत असाल, तर चिमूटभर सुंठ व हळद पावडर कोमट दूधामध्ये मिसळून प्यावी.

• उन्हाळ्यात थोड्याशा श्रमानेही अशक्तपणा जाणवतो, यावर उपाय म्हणून दररोज सकाळी भरपेट नाश्ता करावा.

• तूप साखर पोळी, गूळ पोळी, घावणे, विविध भाज्यांची थालीपीठे, बाजरीची भाकरी किंवा ऑल टाईम फेव्हरेट असणारे पोहे खाणे योग्य ठरेल.

• दुपारच्या जेवणात वरण भातासोबत काकडी, गाजर, बीट, टॉमेटो किंवा पांढरा कांदा यापैकी आवडीनुसार हव्या त्या कॉम्बिनेशनची कोशिंबीर असायला हवी.
• जेवणानंतर, धणे जि-याची पावडर घातलेले ताक पिणे आवश्यकच आहे. ताक पचनशक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते.

• रात्रीचे जेवण जरा हलके असावे. जेवणाची सुरुवात भाज्यांचे सूप घेऊन केल्यास उत्तम! पोळी-भाजी-भात-वरण, मूगाची खिचडी-कढी किंवा भाजी-भाकरी यापैकी कुठलेही कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता.

• उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या जीवनसत्त्वे देणारा फलाहार तर घेतलाच पाहिजे. वेलची केळी, मोसंबी, गोड संत्री, सफरचंद, डाळींब, कलिंगड ही फळे खावीत. दिवसभर एसीमध्ये काम करताना तहान लागत नाही त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून आठवणीने दिवसभरात किमान दीड लिटर पाणी प्यावे.

ऑफीसला जाणा-यांना दुपारी गरम जेवण मिळणे शक्य नसते, अशावेळी डब्यातील थंड जेवण निदान वेळेवर पोटात जाणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये अशक्तपणा, घेरी येणे किंवा उन्हाळी लागणे अशा समस्यांना दूर ठेवण्यासाठी असा चौरस आहार घ्यावा, सोबत जेवणाच्या वेळाही सांभाळाव्यात.

More Articles
Designed and Developed by SocioSquares