hair banner

ऑफिससाठीच्या हेअर स्टाईल्स!

कपड्यांच्या फॅशन सोबत बदलते, ती केसांची स्टाईल. नवनवे हेअर कट्स तरुणी जितक्या हौशेने आजमावून पाहातात. तितकेच ते केस आकर्षकरित्या बांधणे देखील विचारपुर्वक ठरवावे लागते. लग्नसोहळ्यासाठी निराळी हेअर स्टाईल, तर कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी आणखी वेगळी, जरा हटक्या पद्धतींनी केस बांधण्याचा फंडा सध्या रुढ झालाय. आपल्यालाही फॅशन बाबत मागे राहून चालायचे नाही. जे जे नवं, ते ते शिकून घ्यायला हवं. तेव्हा खास ऑफिसला जाताना केसांना आकर्षक बनवण्याच्या नव्या त-हा जाणून घेऊया.

पिन अप ट्विस्ट

या स्टाईलसाठी अवघ्या ५ ते ६ हेअर पिन्स लागतील. एका बाजूचे केस खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे पिन अप करुन घेतल्यानंतर ते दुस-या बाजूच्या केसांसोबत ट्विस्ट करुन घ्यावेत. व मानेजवळ हलकेच वेणीचे दोन पेडी घ्याव्यात.

hairstyle (1)

बिग बन

लांब केसांचा छान बिग बन बांधता येईल. साधा सोप्पा व झटपट करता येणारी ही हेअर स्टाईल सणासुदीलाही शोभून दिसेल.

hairstyle (2)

फ्रेंच ट्विस्ट

या हेअर स्टाईलमुळे केस बिलकूल गुंतणार नाहीत. वेणी घालयला जितका वेळ लागतो, त्याहून कमी वेळात फ्रेंच ट्विस्ट सारखी हेअर स्टाईल करता येते. केस हायलाईट केल्यास फॉर्मल्सवर मस्त शोभून दिसते.

hairstyle (3)

ट्विस्टी बन

मधोमध भांग पाडत केसांचे दोन पॉनी बांधावेत. तेच गोलाकार फिरवून मग एकमेकांत खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे पिन अप करावेत. ही हेअर स्टाईल दिसायला अवघड दिसते, पण काही मिनिटांत करता येते; इतकी सोप्पी आहे.

hairstyle (4)

लो बन

या हेअर स्टाईलसाठी फक्त एक हेअर रबर लागेल. ज्याच्या साहाय्याने लो बन सहज बांधता येतो व दिवसभर छान राहतो देखील.

hairstyle (5)

ऑफिसला जाताना केसांची बांधणी निटनेटकीच हवी. कपाळावर, डोळ्यांवर रुळणारे केस फॉर्मल्सवलर शोभून दिसत नाहीत. त्यामुळे, नेहमीपेक्षा जरा वेगळ्या हेअर स्टाईल्स करुन पाहायला हव्यात. कारण, हेअर स्टाईलमध्ये चेह-याचा संपूर्ण लूक बदलण्याची ताकद असते.

Source – pinterest

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares