YOG (1)

ऑफीसमध्ये बसल्याजागी करावेत हे व्यायाम!!

ऑफीसमधील सततचे बैठे काम व त्यामुळे वाढणा-या शरिरीक व्याधी! स्थूलपणा, सांधेदुखीसारख्या आजारांवर वेळीच उपाय करायला हवेत. दिवसातील जास्तीत जास्त तास खुर्चीवर बसून राहिल्याने कमीवयातच शरीराच्या अशा बारीक सारीक कुरबुरी सुरु होतात. व्यस्त दिनक्रमातून खास व्यायामासाठी वेळ राखून ठेवता येत नसला, तरी ऑफीसमध्येच काही मिनिटे हे बैठे व्यायाम प्रकार तरी करता येतील.

मान –

कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रिनकडे पाहात तासनतास काम करताना, मान आखडते, खांदे दुखतात, हात पाय किंवा बोटांचे स्नायू जड झाल्यासारखे वाटतात, डोळे दुखतात व डोळ्यांतून पाणी वाहू लागते. अवयवांची होणारी साचेबद्ध हालचाल हे यामागील महत्त्वाचे कारण असून, आखडलेल्या स्नायूंना मोकळे करण्यासाठी पुढील छोटे छोटे व्यायाम प्रकार नक्की उपयुक्त ठरतील.

डोळे-

 • मान सरळ ठेवून, डोके खाली न करता डोळ्यांची वर खाली हालचाल करावी.
 • उजवीकडून डावीकडून, डावीकडून उजवीकडे अशी नजर फिरवावी.
 • आता, डोळ्यांची तिरपी हालचाल अपेक्षित असून, डोळ्यांच्या वरच्या दिशेस उजव्या कोप-यास पाहा व नजर तिरपीच खाली घेऊन डाव्या कोप-यात पाहावे.
 • डोळ्यांची वर्तुळाकार हालचाल करावी. एकदा घड्याळ्याच्या दिशेने व नंतर घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने नजर फिरवावी.

मान-

 • प्रथम मान डावीकडून उजवीकडे वळवावी, मग उजवीकडून डावीकडे फिरवावी.
 • आता, मानेची अशीच हालचाल वर व खाली अशा दिशांना करावी.
 • वरील क्रिया दोन तीनदा केल्यानंतर, मान चक्राकार फिरवावी.

पंजा व मनगट-

 • प्रथम, अंगठ्याच्या टोकाने करंगळीला स्पर्श टोकाला स्पर्श करुन तळवा मूळ स्थितीत आणावा. इतर प्रत्येक बोटासाठी ही क्रिया समान राहील. चारही बोटांना अंगठ्याने स्पर्श करुन झाल्यावर पुढील मूठीचा व्यायाम करावा.
 • मूठ घट्ट आवळून, हळुहळू सैल करावी. बोटे सरळ करुन, बोटे अधिकाधिक पसरावीत व पुन्हा मूठ बंद करावी.
 • आता, मूठ मनगटातून आधी उजवीकडे मग डावीकडे नंतर चक्राकार फिरवावी.

खांदे-

 • हात पुढून कोप-यात वाकवून, मुठी वर उचलाव्यात व अंगठे खांद्याला लावावेत.
 • आता, हात पुढे ताणून जमिनीला समांतर ताठ ठेवावेत व हळुहळू हात बाजूला ताणून जमिनीला समांतर ठेवावेत.
 • हात डोक्यावर ताणून एकमेकांना समांतर ठेवा व हळुहळू शरीर पुन्हा मूळ स्थितीत स्थिर करा.

पाय

 • पायांची सततची स्थिती बदलून पाय ताठ करावेत.
 • पायांची बोटे घट्ट जवळ घेऊन, पुन्हा सैल सोडावीत.
 • खुर्चीवरच पाय मागे पुढे हलवावेत. शक्य असल्यास, दहा वीस पावले चालून पुन्हा जागेवर येऊन बसावे. यामुळे, कमरेपासून आखडलेल्या स्नायूंना आराम मिळून, पायांतील जडपणा दूर होईल.

वरील, व्यायाम प्रकार दिसायला छोटे असले, तरी मोठे आरोग्यदायी परिणाम देणारे आहेत हे नक्की! फक्त हे मायक्रो व्यायाम प्रकार नियमित करायला हवेत. चला, तर आजपासूनच सुरुवात करा!! शारीरिक व मानसिक मरगळ दूर करुन पुन्हा उत्साहाने स्वत:ला कामात गुंतवायचे, तर असा एक्सरसाईज ब्रेक

More Articles
Designed and Developed by SocioSquares