Kurdaya (1)

कर्रम् कुर्रम ‘कुरडया’!

कुरडया
साहित्य – १ किलो गहू, १ चमचा हिंग पावडर,मीठ

पाककृती – गहू तीन दिवस पाण्यात भिजत ठेवावेत. प्रत्येक दिवशी गव्हातील पाणी बदलावे. तिस-या दिवशी गहू वाटून त्यातील चोथा बाजूला वेगळा करुन सत्व काढून घ्यावे. सत्व रात्रभर झाकून ठेवावे. दुस-या दिवशी वर आलेले निवळीसारखे पाणी फेकून द्यावे व खालील दाट सत्व पाण्याने मोजून घ्यावे. जेवढी भांडी गव्हाचे सत्व असेल तेवढी भांडी पाणी उकळवण्यास ठेवावे.

पाण्यात अंदाजे मीठ व हिंगाची पावडर घालावी. पाण्याला उकळी आल्यावर भांड्यात एका बाजूने गव्हाच्या सत्वाची धार धरुन पीठ लाकडी चमच्याने सतत हलवावे. गुठली होऊ देऊ नये. पीठ शिजत आले की, घट्ट व साधारण पारदर्शक होईल. पीठ खाली उतरवून शेवयांच्या सा-यात भरुन प्लॅस्टिकच्या कागदावर छोट्या कुरडया घालाव्यात. दुस-या कुरडया उलट्या कराव्यात व दोन ते तीन दिवस कडक उन्हात वाळवून घ्याव्यात. अशा तयार कुरडया हवा बंद डब्यात साठवून ठेवाव्यात.

टेस्टी’कुरडया’ तुम्ही नक्की करुन पाहा. वाळवणाचे आणखी पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत खास उन्हाळी स्पेशल रेसिपीजमधून, तेव्हा नियमित भेट देत रहा झी मराठी जागृतीच्या वेबसाईटला!
आता, कुरडयांची रेसिपी कशी वाटली हे सांगा तुमच्या कमेन्ट्सद्वारे,

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares