Inspiration > कविता महाजन, साहित्य / कला
kavita-mahajan

कविता महाजन, साहित्य / कला

कवियित्री , कादंबरीकार, अनुवादक आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या असे कविता महाजन यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत. कमी आणि साध्या शब्दात मोठे सत्य सांगणे हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. ‘ब्र’,’भिन्न’, ‘कुहु’ या त्यांच्या मराठीतल्या कादंबऱ्यांना समीक्षकांनी देखील गौरविले आहे.

‘ब्र’ आणि ‘भिन्न’ यातून स्त्रियांविषयक ज्या पठडीतले लेखन केले जात होते त्याविषयीच्या जुन्या कल्पनांची चौकट मोडली आहे.

कविता महाजन यांच्या मते,” स्त्रियांनी आता त्यांच्या भोवती असलेल्या अदृश्य अशा लेखनासाठीच्या मर्यादा ओलांडायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला फक्त नातेसंबंध , स्त्रियांचे घरगुती आयुष्य आणि चार भिंतींमधील त्यांचे अस्तित्व याबद्दलच लिहिले जात होते मात्र आता या चौकटीच्या पलीकडे स्त्रिया चालल्या आहेत.”. ब्र यामध्ये महिला सरपंच आणि पंचायत राज व्यवस्थेनंतरचे त्यांचे आयुष्य याविषयी भाष्य केले आहे तर ‘भिन्न’ मध्ये एचआयव्ही एड्सच्या प्रादुर्भावाखाली असलेल्यांच्या आयुष्याबद्दल सांगितले गेले आहे.

ममत्व आणि भावनाविष्कार नाकारून कविता महाजन या थेट राजकीय, सामाजिक आणि अर्थशास्त्रीय बाबींकडे दिशानिर्देश करतात. ‘कुहु’ हा एक मल्टीमीडिया कादंबरीचा प्रकार आहे. दृकश्राव्य फिती , अॅनिमेशन, कविता , शास्त्रीय बैठक असलेले संगीत तसेच मूळ चित्रकलाकृती कि ज्यात कलेने विणलेले शब्द असतील असा विविधतेने नटलेला भारतातील पहिला कलाप्रकार आहे.

Designed and Developed by SocioSquares