kanda pohe banner

‘कांदे पोहे’ शिजले, ‘लग्न’ ठरले!

कांदे पोह्यांचा कार्यक्रम कितीही चिडीचूप पार पडला, तरी पंचक्रोशीत चर्चा व्हायचीच! गरमागरम ‘कांदेपाहे’ मुलीच्या हातची चव वर पक्षापर्यंत अचूक पोहोचवायचे. मग, गाऊन दाखवं, चालून दाखवं, बोलून दाखवं अशा खुळचट प्रश्नमंजुषेला मुलगी सामोरी जायची. कधी मनापासून, तर कधी मनाविरुद्ध ‘हो’ला ‘हो’ करणारी, लाजरी बुजरी ‘ती’, आता शिक्षणाच्या जोरावर स्वत:ची मतं बाळगून आहे. सारासार विचार करुन निर्णय घेऊ लागली आहे. ‘तो’ देखील अपेक्षांच्या यादीत बदल करु लागलाय, संकुचित विचारांना थारा न देता घरातील, समाजातील सजकतेने काळानुसार या कांदे पोहे कार्यक्रमाची रुपरेषा सकारात्मकरित्या बदलली.

वधू वराची पहिली भेट, आई वडील घडवून आणायचे. आता, मुलंच जोडीदाराशी आपल्या पालकांची ओळख करुन देतात. स्वत:ची पसंती निवडण्याची मुभा मिळू लागली, त्यापुढे जाती धर्माची बंधनही गळून पडली. अशी बिनधास्त व बेधडक तरुणाई दोन कुटुंबांना एकमेकांसमोर आणू लागली. आधी वधू वरांचे जमते, मग व्याहींना जमवून घ्यावेच लागते. असं काहीस घडतं, पण सामंजस्याने सारं पार पडतं.

हल्लीच्या अरेंज मॅरेजमध्ये आता भेटण्याचं ठिकाण घराऐवजी छानसं हॉटेल असतं, पत्रिका वैगरे पाहिल्यावर संपूर्ण कुटुंब नाही, तर प्रथम मुलगा मुलगी स्वतंत्र भेटून, बोलून, एकमेकांचे विचार जाणून घेतात. त्यांनी एकमेकांना पसंत केलं, की मग घरच्यांची एन्ट्री होते. तिच्या जेवणाची आवड तिने केलेल्या कुठल्याही पदार्थातून जाणून घेण्यासाठी वरपक्ष तयार असतो, ते काही कांदे पोहेच हवेत असा हट्ट धरत नाहीत. यातही पुन्हा सामंजस्य आहेच ना!

जुन्या नव्या पिढीने या परस्पर जुळवून घेण्यातून कांदे पोह्यांची रेसिपी जरा बदलली. ओळखी पाळखीतून लग्नपत्रिका मागवून केली जाणारी गुणांची तपासणी, वधू पाहिजे, वर पाहिजेच्या जाहिराती, मेळावे, सोशल मिडीया ही माध्यमेही अचूक जोडीदार शोधून देतात. आपलं काम सोपं करतात.

स्थळ शोधता शोधता, चार जोडी पायताणे झिजले! असे म्हणण्याचा काळ मागे सरला असून, आता एका क्लिकवर जगभरातील स्थळे नजरेसमोर असतात. या प्रक्रियेत आता, झी मराठी वाहिनी देखील तुमच्यासोबत आहे, ‘प्रत्येक लग्नासाठी, लग्नकरणा-या प्रत्येकासाठी’ ती घेऊन आलीये अनोखी ‘स्वभाव गुणमिलन चाचणी’ या लिंकवर क्लिक करुन अधिक माहिती जाणून घ्या-  http://www.tumchaaamchajamla.com/ घरबसल्या रजिस्ट्रेशन, स्वत:विषयी माहिती, जोडीदाराकडून अपेक्षा याच जोरावर मिळणार मनपसंत स्थळ!

‘जुनं तेच सोनं’ हाच गुणमंत्र चिरकाल! भन्नाट फॅशन येवो, नऊवारीची शान निराळीच, सातशे प्रकारात न्यारी कोल्हापूरीच आणि ‘लव कम अरेंज’ म्हटलं तरी कांदे पोहे शिजणार आणि शुभमंगल लग्न जमणार!

More Articles
Designed and Developed by SocioSquares