hair fall banner

केस गळणे थांबवतील ‘हे’ पदार्थ!

सध्या तरुणांमध्ये अकाली केस गळण्याची समस्या वाढली असून, अनियमित आहार वर कामाचा ताण, त्यातून पौष्टिक
पदार्थांना रजा देऊन, वरचेवर फास्ट फूड सारखे चटपटीत चविष्ट पदार्थ आहार म्हणून सेवन करण्याची जडलेली नवी
पद्धत. यामुळे, केसांना आवश्यक तितकी पोषकतत्वे न मिळाल्याने ते पांढरे होऊ लागतात , तसेच प्रदुषित हवा त्यांचा
बाह्य पोत खराब करते.
नाजूक केसांची अशी आतंर्बाह्य हानी झाल्यावर व्यक्तिचे वय वैगरे लक्षात न घेता ते गळू लागतात व ऐन तारुण्यात टक्कल
पडू लागतं. परुषांना नवी हेअर स्टाईल म्हणत चालून जातं, पण महिलांचे काय? त्यांना हे थोडीच शोभून दिसणार आहे.
तेव्हा, वेळीच आहारावर लक्ष द्या व त्यावर उपाय म्हणून आहारात खालील पदार्थांचा समावेश करा.
 पालेभाज्या – लोहयुक्त प्रथिने देणा-या पालेभाज्या बहुतेकांच्या नावडत्या असतात. त्यामुळे, नियमित
पालेभाज्या खाल्या जात नाहीत. असे होऊ नये म्हणून, किमान विविध रेसिपीजमध्ये अशा पालेभाज्यांचा
समावेश करावा. त्यातील लोह केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
 गाजर – गाजर कच्चेच खावे किंवा गाजराजा ज्युस प्यावा. त्यातील ‘ई’ व ‘सी’ जीवनसत्त्वामुळे टाळूवरील
रक्ताभिसरण सुधारते व केसांची व्यवस्थित वाढ होण्यास मदत होते.

 रताळे – भरपूर जीवनसत्त्वे व बीटा कॅरोटिन रताळ्यातून केसांना मिळते, ज्यामुळे केस गळण्याची समस्या दूर
होण्यास मदत होते.

 अक्रोड – नियमित अक्रोड खाल्ल्याने केसांना मजबूती मिळते. केसांची योग्य वाढ होऊन ते गळायचे थांबतात.

 संत्री – संत्र्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने, केस गळणे थांबू शकते, सोबत केस अकाली पांढरे
होणेही थांबते.

 बदाम – स्मरणशक्ती वाढवणारे बदाम केसांच्या आरोग्यासही लाभदायी ठरतात. रोज दोन ते तीन भिजवलेले
बदाम खाल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

 पेरू – या फळामध्ये असणारी ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्वे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक असतात. तेव्हा,
पेरु मीठ लावून खावा किंवा पेरुचा ज्युस प्यावा. कुठल्याही त-हेने पेरुतील जीवनसत्त्वे शरीराला मिळणे गरजेचे
आहे.
फक्त अचूक आणि पौष्टिक आहाराच्या जोरावर केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. मात्र, त्यासाठी
वरील पदार्थांचे सेवन करण्यात नियमितता ठेवावी लागेल, तरच अपेक्षित परिणाम दिसू शकतील.

More Articles
Designed and Developed by SocioSquares