lense banner

कॉण्टॅक लेन्सेस वापरण्याआधी, हे वाचा!

सगळ्या आऊटफीटवर चष्मा रुचत नाही. अशावेळी चष्म्याऐवजी कॉण्टॅक लेन्सेल वापरणं, फॅशनचा भाग बनलंय. तर, डोळ्यांना नंबर नसूनही वेगवेगळ्या रंगाच्या मॅचिंग लेनेन्स लावणं कुतूहलाचंही वाटतं. भारतीयांच्या डोळ्यांचा रंग मुख्यत्वे डार्क ब्राऊन किंवा काळाच असल्याने खा-या निळ्या अशआ रंगीत डोळ्यांचं भारी आकर्षण वाटतं.

मात्र, या लेन्सेस वापरताना डोळ्यांसारख्या नाजूक अवयवाला फार जमावं लागतं. अन्यथा डोळ्यांना संसर्ग होऊन नजर अधू होऊ शकते. प्रथमत: चांगल्या दर्जाच्या लेन्सेस खरेदी कराव्यात. काही लेन्सेस पुन:पुन्हा वापरता येतात, तर यूज ऍण्ड थ्रो प्रकारातील एकदाच वापरता येतील अशाही लेन्सेस बाजारात उपलब्ध आहेत. तसेच, डोळ्यावर लावताना त्यांची पुढची व मागची बाजू नीट लक्षात घ्यावी. बुबुळावर उलट्या लावल्यास नीट बसत नाहीत, मग डोळ्याला खाज येणे, तो चुरचुरणे असा त्रास होऊ शकतो.

तसेच त्या दिर्घकाळ लावून ठेवू नयेत. डोळ्यांचे कार्य सुरळीत सुरु रहाण्यासाठी त्यांना व्यवस्थित ऑक्सिजनचा पुरवठा होत राहणे गरजेचे असते. लेन्सेसमुळे अप्रत्यक्षरित्या प्राणवायूची अडवणूक होते. यामुळे, डोळ्यांच्या पटलावर परिणाम होतो, डोळे कोरडे होऊन संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अंधूक दिसू लागते. म्हणून रात्री झोपतानाही लेन्सेस आठवणीने काढाव्यात.

लेन्सेसच्या स्वच्छतेच्या काही पद्धती आहेत. त्याबाबत अनभिज्ञ राहू नये. कुठल्याही साध्या पाण्याने त्या धुवू नयेत, दुषित पाण्यातील जंतूचा संपर्क लेन्सेसद्वारे थेट डोळ्यांशी येईल, म्हणून दिलेल्या क्लिनिंग सॉल्यूशनमध्येच त्या बुडवून ठेवाव्यात. ते सोल्यूशनही वेळोवेळी बदलावे. लेन्सेसच्या डबीत धूळ जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी.

फॅशनेबल होताना डोळ्यांसारख्या अत्यावश्यक अवयवाचे कायमचे नुकसान होणार नाही याबबतीच सतर्क रहायलाच हवे. लेन्सेस वापरण्याच्या नियम व अटी गांभीर्याने न घेतल्यास कायमची दृष्टी गमावून बसणे नशिबी येऊ शकते. तेव्हा, सांभाळून!

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares