CROSSfOODD (1)

चुकूनही ‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नयेत!

राहणीमान झपाट्याने बदलतेय आणि तितक्याच जलद आपली खाद्यसंस्कृती बिघडतेय. वेळेवर नाही, तर वेळ मिळेल तेव्हा तेव्हा खादाडी करण्याचा भुकेचा नवा फंडा छान रुळलायं. आई वाढेल ते गुमान खाण्याऐवजी न्युट्रीशनशीस्ट सांगेल तेच खाण्याचा अट्टहास धरलेल्या गुणी बाळांचे तब्येतीकडे नीट लक्ष देणे, कौतुकास्पद आहेच. तज्ञ्नांचे विकतचे सल्ले आवर्जून घ्या, पण जुनी पिढी कुठल्याही मोबदल्याविना जे आरोग्य सल्ले देत आलीय, ते त्याआधी घ्या. आहार घेण्याच्या काही चांगल्या पद्धतींची, सवयींची सरमिसळ करुन चालायचे नाही. नाहीतर शरीराला विरुद्ध आहाराचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

विरुद्ध आहार म्हणजे काय? तर दोन भिन्न पदार्थांतील गुणधर्म, पोषकतत्त्वे, त्यांच्यावर केलेली प्रक्रिया एकमेकांस पुरक नसेल, तर त्या दोन पदार्थांचे एकाचवेळी सेवन करण्याने कधी अपचन, पोटदुखी, कफ होणे, सूज येणे, त्वचेचे रोग, पुळकुट्या उठणे, रक्ताचे विकार, मानसिक अस्थैर्य अशा समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच, विरुद्ध आहारात मोडणा-या पदार्थांच्या जोड्यांविषयी जाणून घेऊया-

  1. उष्ण व शीत पदार्थांचे एकत्रित सेवन करु नये. मासे किंवा चिकनसारख्या मांस-मच्छीसोबत दूधाचे सेवन करु नये.
  2. मुळा, पालेभाज्या, लसूण, मसालेदार पदार्थ खाल्ल्यावर दूध पिऊ नये, तसेच तांदळाच्या किंवा कुठल्याही डाळीच्या खिचडीत दूध घालू नये.
  3. तसेच, फळांसोबत, मांस मच्छीसोबत दही देखील खाऊ नये.
  4. तांबे किंवा पितळीच्या भांड्यात आंबट पदार्थांना निळसर रंग येतो.
  5. दही तापवून किंवा मध गरम करुन सेवन करुन नये.
  6. तूप व मध समप्रमाणात घेऊ नये.
  7. पालक तिळाच्या तेलाने तळून वगैर खाऊ नये.
  8. फळांवर पाणी पिऊ नये.

वेळेवर न्याहारी घेणे किंवा जेवणे जितके गरजेच आहे. तितकेच आवश्यक आहे वरील नियमावलीचे पालन करणे. पदार्थांचे गुणधर्ण समजून घेऊन त्यांची चुकीच्याप्रकारे सरमिसळ करु नये. पचनशक्ती कितीही बळकट असली, तरी विरुद्ध आहार न घेणेच योग्य ठरेल. मुख्यत्वे, हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर देताना पदार्थांमध्ये कुठले जिन्नस वापरले गेले आहेत, हे विचारा. हल्ली भरपूर खाद्यसंस्कृतींचा मिलाप झाल्याने, खवय्यांसमोर नवनव्या चवी पेश केल्या जातायत. अशी एखादी नवी डिश ट्राय करण्याआधी त्यामध्ये विरुद्ध पदार्थ वापरले नाहीत ना, इतकी खात्री नक्की करुन घ्या.

More Articles
Designed and Developed by SocioSquares