SUMMER JUICE (1)

गारेगार उन्हाळी पेय!

तापलेल्या सूर्य अंगाची लाहीलाही करतो. अशावेळी, फॅन, एसी, कूलर सारखी यंत्रे आपल्याला वरवरचा थंड हवा देतातही, पण आतंरिक थंडाव्याकरिता पोटात काहितरी गारेगार जायलाच हवं! म्हणून, घेऊन आलोय आज घरच्याघरी काही मिनिटांत तयार होतील अशी चवदार सरबते!

घरगुती जलजिरा

साहित्य – २ टि.स्पू. जिरं, १ टि.स्पू. काळ मीठ, वाटीभर पुदिन्याची पाने, वाटीभर चिरलेली कोथिंबीर, १ कप पाणी, १ टि.स्पू. लिंबाचा रस

पाककृती- प्रथम जिरं भाजून घ्यावं. नंतर, ते खलबत्यात काळ्या मीठासोबत कुटून घ्यावं. त्याची जाडसर पूड तयार करावी. त्यानंतर, मिक्सरमध्ये पुदीन्याची पाने, कोथिंबीर व एक कप पाणी मिसळून मिश्रण एकजीव करुन घ्यावं. जलजिरा सर्व्ह कराताना, वरील तयार मिश्रणात थोडा लिंबाचा रस व जिरं मीठ पूड मिसळावी. स्वादानुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त ठेवता येईल. जलजिरा तयार करुन फ्रिजमध्ये थंड करुन मग सर्व्ह केल्यास अधिक उत्तम!

थंडगार पियुष

साहित्य – श्रीखंड, ताक, साखऱ, वेलची पूड, जायफळ पूड, बदाम पिस्त्याचे काप

पाककृती – सर्वप्रथम श्रीखंड एका भांड्यात घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये, ताक, साखर, वेलची व जायफळ पूड मिसळावी. सर्व जिन्नस व्यवस्थित ढवळून घ्यावेत व तयार पियुष किमान एक तास फ्रिजमध्ये ठेवावे. सर्व्ह करताना त्यावर बदाम पिस्त्याचे काप वरुन घालावेत. ज्यामुळे, चविष्ट पियुष देखणेही दिसू लागेल.

पान गुलकंद सरबत

साहित्य- १० ते १२ विड्याची पाने, ४ टे.स्पू. साखर, १ कप पाणी, ३ टे.स्पू. गुलकंद, ३ ग्लास दूध, सब्जा,

पाककृती- प्रथम विड्याच्या पानांचे देठ काढून टाकावेत. आता, विड्याच्या पानांचे हातानाचे तुकडे करुन मिक्सरच्या भांड्यात घालावेत, सोबत त्यामध्ये कपभर पाणी मिसळून मिक्सरमध्ये पाने फिरवून घ्यावीत. हे तयार मिश्रण चाळणीच्या सहाय्याने गाळून घेत, चोथा बाजूल काढत रसामध्ये चमच्याच्या सहाय्यानेच गुलकंद मिसळावा. आता, उकळवून थंड केलेलं दूध त्यामध्ये मिसळावं. त्यानंतर, अंतीम पण महत्त्वाचे जिन्नस म्हणजे सब्जा घालावा. ज्यामध्ये थंडाव्याचा गुण तर आहेच, सोबत उन्हाळी सरबतांचा अचूक फिल देण्याची ताकद देखील आहे.

कशा वाटल्या रेसिपीज्? नक्की कळवा आणि ऊन्हाळी सरबताच्या तुमच्याजवळ काही लज्जतदार व अनोख्या रेसिपीज् असतील, तर त्याही जरुर शेअर करा खालील comment box मध्ये! त्याची शानदार पोस्ट तयार करुन शेअर करु जागृतीच्या सख्यांसोबत तेही तुमच्या नावासहित! आम्ही वाट पाहतोय तुमच्याजवळील गारेगार पाककृतींची…..

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares