wife (1)

गृहिणी, तू देखील स्वावलंबी बनू शकतेस!

लग्नाआधी नोकरी करणारा महिलावर्ग ब-याचदा लग्नानंतर घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून गृहिणीची भूमिका स्विकारतो. मात्र, काही वर्षांत या निर्णयावर पुर्नविचार करावासा वाटतो. किमान स्वखर्चासाठी स्वत:ची अशी काही रक्कम हाती असायला हवी, याची जाणीव होते व शोध सुरु होतो नव्या संधीचा!

पूर्णवेळ नोकरी करण्याचा निर्णय घेत असाल, तर तुमच्या शैक्षणिक क्षेत्रानुसार तुम्ही नोकरीचा शोध घेऊ शकता. हल्ली वेगवेगळ्या सोशलमिडीआ साईट्स किंवा खास नोकरी शोधण्यास उपयुक्त ठरतील अशा भरपूर साईट्स उपलब्ध आहेत. ज्यांचा विनामूल्य वापर करता येतो. मात्र, नोकरीसाठी घरातून बाहेर शक्य नसल्यास घरगुती लघुउद्योगाचे पर्याय धुंडाळावे लागतील. तुमच्या ह्याच शोधप्रक्रियेचा भार हलका करण्याचा आम्ही करण्याचा पयत्न आम्ही करित असतोच. आपल्या याच zeemarathijagruti.com या वेबसाईटवरील करिअर विभागात या संदर्भातील विविध लेख तुम्ही वाचू शकता. आज पुन्हा लघुउद्योगासाठीच्या काही नव्या पर्यायांचा मागोवा घेणार आहोत.

टूर प्लॅनर:

फिरायची आवड असणारा एखादा, ट्रिपचे व्यवस्थापन पाहण्यातही पटाईत असतो. कुठल्याही अनोळखी शहराला भेट देण्याआधी त्या शहराची तोंडओळख तरी हवी. भेट देण्याआधी त्या शहरातील प्रेक्षणीय स्थळे, देवस्थानं, ऐतिहासिक ठिकाणांविषयी सविस्तर माहिती करुन घेणारे काही भटुकडे असतात. अशांकडे माहितीचा संग्रह जमा होता. हा शोध अभ्यास आणखी थोडा विस्तारित केल्यास ट्रेन, प्लेनच्या टिकींटाचे बुकिंग करण्यापासून योग्य दरातील आरामदायी हॉटेल सगळ्याची माहिती गोळ्या केल्यास, स्वस्त व मस्त ट्रिप प्लॅन करुन देण्याचे काम घरबसल्या करता येईल. मान्य की हल्ली भरपूर ट्रॅव्हल साईट्स सुरु झाल्यात, पण अजूनही असे अनेक पर्यटक आहेत ज्यांना यंत्रांनी पुरवलेल्या माहितीपेक्षा प्रत्यक्ष साधलेल्या संवादाबाबत अधिक खात्री वाटते. या लघुउद्योगाचे काम तुम्ही घरुन सहज करु शकता. फक्त, भूगोल पक्का हवा आणि पर्यटन क्षेत्राविषयी सखोल माहिती हवी. तुम्ही स्वत: एक मनस्वी प्रवासप्रेमी असाल तर तुम्हाला हा अभ्यास करणे बिलकूल कठीण जायचे नाही.

टेक्नोसॅव्ही:

नवनवी माध्यमे तुमची दोस्त असतील आणि त्यांना हाताळणे तुम्हाला सहज जमत असेल. तर वेळ दवडू नका ‘ज्ञान दिल्याने वाढते’ या उक्तीस ताबडतोब खरे उतरा. हा उद्योग अगदी घरबसल्या करता येईल. स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप कसे हाताळावेत?, इंटरनेट कसे वापरावे?, वेबसाईट, ब्लॉग अगदी सोशल मिडीआ साईट्स कशा वापराव्यात? हे ब-याच जणांना ठाऊक नसतं. माफक दरात तुम्ही तुमच्याजवळील हे ज्ञान इंतरांना शिकवणी सुरु करुन त्यामार्फत देऊ शकता. ज्याचा त्यांना भरपूर फायदा होईल. वेगवेगळ्या सोयी सुविधांचा ते लाभ घेऊ शकतील. जगभरातील घडामोडींशी ते अनभिज्ञ राहणार नाहीत. हा व्यवसाय यशस्वी करायचा तर तुमच्या ठायी सहनशीलता व चिकाटी हवी. कारण, टेक्नोलॉजीचा वापर ज्याला जमला त्याला सोप्पा वाटतो आणि जो ते समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे त्याला ते पहिलीतल्या बाराखडी इतकं अवघड वाटतं, हे लक्षात घ्यायला हवं.

फॅशन मार्गदर्शक:

वेगानं बदलणा-या फॅशन ट्रेंडवर तुमची बारीक नजर असते? कुणी काय घातलंय, कुणाला काय शोभून दिसतंय किंवा दिसेल? असे विचार तुमच्या डोक्यात शिजत असतात?(प्रत्येक स्त्रीचा हा अंगभूत गुण आहे म्हणा). पण या गुणाला योग्य दिशा दिल्यास त्यात करिअर घडू शकतं. कपडे, दागिने, सॅण्ड्ल्स महिलांच्या सर्व प्रकारच्या स्टाईल विभागात नवं काय आलंय ह्याविषयी सतत माहिती मिळवत राहणं आणि अचूक व्यक्तिपर्यंत अचूक माहिती पोहोचवणं इथे गरजेचं आहे. ह्याला ‘वैयक्तिक फॅशन स्टाईलिस्ट’  म्हणता येईल. हल्ली ब-याच महिलांना आपल्याला काय शोभून दिसेल, हे स्वत:चं स्वत: ठरवण्यापेक्षा कुणीतरी त्याविषयी मार्गदर्शन केलेलं आवडतं.

गृहिणी ते स्वावलंबी गृहिणी असा प्रवास कुठल्याही क्षेत्रात करु शकाल, मात्र जबरदस्त इच्छाशक्ती हवी.  तरच स्वबळावरील स्वकमाईचा आनंद अनुभवता येईल. प्रत्येक मैत्रिणीत तितकी ताकद आहे, गरज आहे फक्त स्वत:त डोकावून पाहाण्याची.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares