greentea (2)

ग्रीन टी घेण्याआधी ‘हे’ वाचा!

सर्वोतोपरी आरोग्यदायी व मुख्यत्वे शरीरातील जास्तीचे फॅट कमी करण्यासाठी सहाय्यक ठरणा-या ग्रीन टीचे योग्य प्रकारे सेवन व्हायला हवे, नाहीतर फायद्याऐवजी नुकसानच अधिक व्हायचे! कुणीतरी स्वानुभवावरुन ग्रीन टी घेण्याचे सुचविले, म्हणून ग्रीन टी घेण्याचा विचार करत असाल, तर आधी हे वाचा! हा हिरवा चहा कशाप्रकारे आरोग्यासाठी लाभदायी आहे हे प्रथम जाणून घेऊ,

  • ग्रीन टीमध्ये ऍण्टी ऑक्सिडंट्स असतात, तसेच पोलीफिनोन तत्त्वामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन, रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
  • ग्रीन टी बनवताना, कपभर पाणी उकळवून घ्यावे. त्यामध्ये ग्रीन टी डीप सॅशे टाकून दोन मिनिटे त्यावर झाकण देऊन ठेवावे.
  • बरेचदा ग्रीन टी पिण्याचा केलेला संकल्प साधारण तीन-चार दिवसात बारगळतो, ते त्याच्या उग्र वासामुळे! यासाठी सवय होईपर्यंत त्यामध्ये किंचित लिंबाचा रस, पुदीना किंवा आले टाकू शकता. नाहीतर एक लिटर पाण्यात एक कप ग्रीन टी मिसळून, हे मिश्रण बाटलीमध्ये भरुन ठेवावे व दिवसभर थोडे थोडे प्यायले तरी चालेल.
  • संध्याकाळी उशीराने घेऊ नये, शक्यतो दोन जेवणाच्यामध्ये ग्रीन टी घेतल्यास उत्तम!
  • ग्रीन टी बनवताना त्यामध्ये, दूध किंवा साखर टाकू नये. असे मिश्रण शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.

भारतीय आयुर्वेदात ग्रीन टीचा वापर फार पूर्वीपासून केला जातोय. कर्करोग, उच्चरक्तदाब, त्वचारोग, नैराश्य अशा समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, ग्रीन टी मुख्यत्वे प्रसिद्ध आहे तो वजन कमी करण्यास उपयुक्त ठरणारे पेय म्हणून! मात्र, त्यासोबत नियमित व्यायामही व्हायला हवा, तरच त्याचे इच्छित परिणाम दिसून येतील, हे लक्षात घ्यायला हवे.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares