kitchen banner

घरगुती उपकरणांची काळजी!

गृहिणी असो किंवा working women,घरगुती उपकरणांची काळजी घेण्यासाठी धडपड मात्र सारखीच असते. वेळ मिळेल तसं स्वच्छतेसाठी आणि उपकरणांची काळजी घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठीच काही सोप्या टिप्स तुमच्यासाठी:

Fridge
Fridge स्वच्छ करण्यासाठी २ आठवड्यातुन एकदा ब्लीचिंग पावडरचा वापर करावा जेणेकरून कुबट वास राहत नाही.
Fridge साफ केल्यानंतर तो रिकामा न ठेवता एका पातेल्यात पाणी भरून ठेवावे.

Microwave
Microwave स्वच्छ करण्यासाठी मऊसर कापड ओला करुन हलक्या हाताने तो स्वच्छ करा.

Computer
Computer चा वापर म्हणजे जगण्यातला अविभाज्य भाग झाला आहे म्हणूनच त्याची साफसफाई तितकीच महत्त्वाची आहे
कॉम्प्यूटरच्या कीबोर्डमधली धूळ साफ करण्यासाठी बाजारात एक छोटा ब्रश मिळतो. त्याचा उपयोग करून बटणांमध्ये अडकलेले धूलिकण देखील निघून जायला मदत होते.
कॉम्प्यूटरची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी पाण्यात ग्लिसरीनचे काही थेंब टाकून हलक्या हाताने पुसून घेतली की स्क्रीनला चमक येते.

Mixer
स्वयंपाक करताना मिक्सर नेहमीच वापरात येतो. वाटणाचे डाग मिक्सरला लागून ते पक्के होतात. म्हणून मिक्सरसाठी कव्हरचा उपयोग करू शकता. हे कव्हर आठवड्यातून एकदा धुतले तरी हरकत नाही; पण मिक्सर आतून स्वच्छ राहतो.
रोजच्या वापरातल्या वस्तुंची स्वच्छता करण्यासाठी या सोप्या tips तुम्हाला नक्की उपयोगी पडतील.

More Articles
Designed and Developed by SocioSquares