conditioner

घरच्याघरी बनवू ‘Healthy Conditioners’!

केसांचा बिघडता पोत वेळीच सावरणे गरजेचे आहे. आहारातून पुरेसे पोषक घटक न मिळल्याने किंवा प्रदुषित हवेमुळे ढासळणारे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी कंडिशनरचा नियमित वापर करावा. यासाठी मुख्यत्वे, पुढील घरगुती कंडिशनर वापरुन पाहा.

  1. अंड्यातील पिवळा बलक केसांचा कोरडेपणा दूर करतो, व्हिनेगर कोंडा किंवा डोक्यावरील त्वचेच्या समस्येवर आराम देते, तर ऑलिव्ह ऑईल केस पांढरे होण्याला आळा घालते. म्हणूनच या पोषक घटकांच्या मिश्रणातून तयार झालेले कंडिशनर किती लाभदायी ठरेल हे वेगळे सांगायला नको. हे कंडिशनर तयार करताना २ पिवळे बलक त्यात ४ टे.स्पू. व्हाईट व्हिनेगर व २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल मिसळून हे केस धुण्याच्य १५ मिनिटे आधी केसांना लावावे.
  2. नारळाचे तेल व मध केसांसाठी गुणकारी असल्याने चमचाभर मधात दोन चमचे नारळाचे तेल मिसळून, हे मिश्रण १५ ते २० मिनिटे केसांना लावल्याने केस छान मॉच्छराईझ्ड होतात.
  3. ऑलिव्ह ऑईल अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येवर लाभदायी आहेच, सोबत युव्ही रेजपासूनही केसांचे संरक्षण करते. तर, पुदीन्याचे तेल केसांची वाढीस उपयुक्त ठरते. त्यामुळे, ही दोन्ही जिन्नस समप्रमाणात एकमेकांत मिसळा व केसांना लावा. साधारण २० मिनिटांनी केस धुवावेत.
  4. केसांच्या राठपणामुळे केस तुटण्याची समस्याही बळावते. अशावेळी, त्यांना व्यवस्थित मॉच्छराईझ्ड करण्याची गरज असून, केसांना मुलायम बनवण्यासाठी केळी वापरावीत. केळी उत्तम कंडिशनरचे काम करतात. हे कंडिशनर तयार करताना १ केळ, १ अंड, ३ टे.स्पू. मध, ३ टे.स्पू. दूध, ५ टे.स्पू. ऑलिव्ह आईल हे जिन्नस एकत्र करुन त्याची पेस्ट बनवून घ्यावी. साधारण १५ ते ३० मिनिटे केसांना हे मिश्रण लावून ठेवावे व नंतर केस स्वच्छ धुवावेत.

वरीलपैकी, कुठलेही कंडिशनर लावून झाल्यावर केस धुण्यासाठी तुम्ही तुमच्या पसंतीचा शॅम्प्यू वापरु शकता. या घरगुती कंडिशनरमध्ये कुठलेही केमिकल्स नसल्याने, याचे साईड इफेक्ट होत नाहीत. बाजारात उपलब्ध असणा-या रेडिमेड कंडिशनरपेक्षा घरच्याघरी, काही मिनिटांत तयार होणारी ही कंडिशनर्स अधिक स्वस्त व आरोग्यादायी आहेत. पटत नसेल, तर तुम्ही स्वत: आजमावून पाहा…

More Articles
Designed and Developed by SocioSquares