Wallpaint (1)

घरातल्या बोलक्या भिंती!

घराला मनाजोगतं सजवण्यासाठी धडपडणा-या प्रत्येकासाठी आजचा खास वॉलपेंटिंग विशेष ब्लॉग! “भिंतींना कान असतात”, पण त्यांना बोलतंही करता येतं, वॉलपेटिंग्सच्या साहाय्याने! घरातील भिंती आतील बाजूने रंगवताना, सरधोपट एकाच रंग वापरण्यापेक्षा कॉनट्रास्ट रंग देण्याचा फंडा मधल्या काळात हिट झाला होता. अजूनही दोन रंगांच्या कॉम्बिनेशनमध्ये खोली रंगवली जाते. मात्र, याहून काहि निराळा व आकर्षक प्रयोग करण्याच्या विचारात असाल, तर वॉलपेटिंग एक सर्वोत्तम पर्याय ठरेल. पाहा तर पुढील सुरेख डिझाईन्स, जे खोलीला अक्षरश: देखणे करतात.

लिव्हिंग रुम किंवा बेड रुममध्ये छान फ्रेश कलर्सच्या मदतीने हलकी फुलकी झाडांची डिझाईन्स रेखाटता येतील. त्यामध्ये फोटो फ्रेम्सनाही स्थान देता येईल.

Wallpainting (2)

 

वरील प्रकारात भिंतीवरील काही भागच डिझाईनने व्यापला जातो. मात्र, खोलीतील एक भिंत पूर्णपणे छानशा डिझाईनने व्यापून टाकणा-या या पर्यायांचाही विचार करायला हरकत नाही. खोलीनुसार देखाव्याची किंवा चित्रांची निवड करावी.

 

Wallpainting (3)

 

भौमितिक आकृत्यांना छानशा रंगसंगीची जोड देणारी पुढील डिझाईन्स! चौकोन, त्रिकोण वापरुन तयार केलेल्या डिझाईन्सची कल्पना फारशी न पटणारी, पण जेव्हा त्यात फिकट गडद रंगांचा योग्य मेळ साधला जातो, तेव्हा त्यांच्यावरुन नजर हटत नाही. पुढील डिझाईन्सवरुन सिद्धच होत जणू…

 

Wallpainting (4)

 

घरातील वस्तूंभोवती चितारलेली अनोखी कार्टुन्स खास बच्चेकंपनीसाठी! अशी कार्टुन्स अगदी इलेक्ट्रिक बटन्सच्या भोवतीही शोभून दिसतात. तेव्हा, छोट्यांची खोली अशा वॉलपेंटिंगने रंगवून त्यांनाही खूष करता येईल.

 

Wallpainting (1)

 

फॅशननुसार आपण आपली स्टाईलही बदलतो, तसा घरालाही येऊदे थोडा मॉर्डन लूक! वॉलपेंटिंग्स करणारे आर्टिस्ट, कारागीर मिळत नसतील, तर ऑनलाईनही वॉलपेटिंग्सचे स्टिकर्स उपलब्ध आहेत. असे आयते स्टिकर्सही वापरता येतील.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares