technology banner

घेऊ शिक्षण तंत्रज्ञानाचे!

२१व्या शतकाला ‘यंत्रयुग’ म्हणून संबोधले जाण्यामागील महत्त्वाचे कारण, या दशकात तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने झालेली प्रगती! दिवसेंदिवस कामे सोप्पी करणारी नवनवीन साधने बाजारात येत आहेत, जी आपली कामे पटदिशी करुन मोकळी होतात. गृहिणींची किचनमधील यांत्रिक अविष्कार शिकून घेण्याची नेहमीच तयारी असते. मग, यामध्ये पाटा वरवंट्याला पर्याय म्हणून मिक्सरचा वापर करणे असो किंवा स्मार्ट ओव्हनवरील बटणांचा उपयोग समजून घेणे असो, किचनमधील कामे ती नेहमीच मोठ्या उत्साहाने करीत आली आहे. स्वयंपाकघरात विविध प्रकारच्या यंत्रांनी प्रवेश केल्यानंतरही त्यांना सोबत घेऊन तिचे काम ती चोख बजावीत आली. मात्र, बहुतांशवेळा किचनपलीकडील टेक्नोलॉजीकडे मात्र ती दुर्लक्ष करताना दिसते. दोन-तीन वर्षाचे लहानगे देखील मात्तबर असल्यासारखे मोबाईल, लॅपटॉप हाताळतात, कारण हे सारं आहेच इतकं सोप्प!

मोबाईलमुळे प्रत्येक पिढी थोडी तंत्रज्ञानाच्या जवळ आली, तर मुख्यत्वे सोशल मिडियामुळे इंटरनेटशी ओळख झाली. मात्र, या पर्यायांचा स्व-विकासासाठी उपयोग करता येऊ शकतो हे समजून घ्यायला हवे.

1.
मोबाईलमध्ये काही महत्त्वपूर्ण अॅप्स डाऊनलोड करुन त्यांच्या वापरातून नवीन गोष्टी शिकता येतील व स्वत:लाही अपडेट ठेवता येईल.

2.
इंटरनेटवरील माहितीपर साईट्स, ब्लॉग्स यांचा शोध घेऊन त्यांना बुकमार्कचा पर्याय देत त्यांचे पुन:पुन्हा वाचन करता येईल.

3.
बॅंकेतील रांगेत उभं रहाण्यापासून सुटका मिळवण्यासाठी मोबाईल बॅंकीग एक उत्तम पर्याय असून, जो तितकांच सोप्पा देखील आहे.

4.
मैत्रिणींनो! तुम्हाला लिखाणाची आवड असल्यास स्वत:चा ब्लॉग लिहायला सुरुवात करु शकता, ज्यामुळे तुमच्या लिखाणाला नवा वाचक मिळेल.

5.
तुमच्या छंदाला लोकांपर्यंत पोहोचवायचे असल्यास फेसबुक या सोशल मिडियावर त्याप्रकारचे पेज तयार करु शकता.

6.
तुम्हाला वाचनाची आवड असल्यास बाजारात आलेल्या नवीन पुस्तकांच्या नोंदी तुम्हाला पाहाण्यासाठी हेच तंत्रज्ञान तुमची मदत करेल.

7.
अगदी नवीन कला शिकायची असल्यास त्याविषयीचे मार्गदर्शनपर व्हिडीओज् सुद्धा इंटरनेटवर सहज व मोफत उपलब्ध आहेत. जे विरंगुळ्याचा देखील उत्तम पर्याय ठरतील.

8.
सुगरण मैत्रिणींनो, तुमच्या आवडत्या रेसिपीज लॅपटॉपमधील वर्ड फाईलमध्ये लिहिण्यास सुरुवात करा, ज्यामुळे बघता बघता तुमच्या स्वत:च्या रेसिपीजचा एक संग्रह तयार होईल.

9.
घरबसल्या नोकरी शोधण्याचा पर्याय देखील इंटरनेटमुळे उपलब्ध झाला आहे. ज्यामुळे, तुम्हाला घरातील कामांचा व्याप सांभाळून अर्थाजन करता येऊ शकते.

वरील, सर्व पर्याय वाचून छान तर वाटंतयं, पणं हे शिकणारं कुठून? हा प्रश्न आहेच! तंत्रज्ञानाची माहिती देणारी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. जे कॉम्पूटर किंवा लॅपटॉप तसेच, इंटरनेटचा वापर कसा करावा याची यथायोग्य माहिती देतात. या नव्या तंत्रज्ञानाला न घाबरता, उलट त्यांचा चिकाटीने मागोवा घ्यायला हवा. लॅपटॉप, टॅब, स्मार्ट फोन्स आणि या सा-यांशी जोडलेल्या इंटरनेटचा ‘मला काय उपयोग?’ असं न म्हणता आधुनिक तंत्रविश्वाची मनसोक्त सफर करायला हवी. कलागुणांची जोपासना करण्यापासून करियरचे पर्याय देण्यापर्यंतची मदत करण्यासाठी आजची टेक्नोलॉजी सज्ज आहे. आपण फक्त तिच्याशी मैत्री करायला हवी!

More Articles
Designed and Developed by SocioSquares