shoe banner

चामड्याचे बूट झटपट करा चकाचक, हे असे….  

फॅशनचा महत्तम भाग असलेल्या उंची फूटवेअर्समध्ये नवनव्या ट्रेंडचं येणंजाणं सुरुच असतं. दुकानात सॅण्डल्सचे इतके प्रकार, वेगवेगळे स्टाईलिश आकार आपल्याला पाहायला मिळतात, की एक जोड विकत घ्यायला जातो आणि हमखास दोन–तीन घेऊनच घरी पररतो. मोह काही केल्या आवरत नाही. त्यात जर तुम्ही लेदर शूजचे चाहते असाल, तर तुमच्याकडे खास स्वत:चं लेदर कलेक्शन असणार यात शंकाच नाही. ते दिसायला जितके देखणे तितकीच त्यांची किंमतही अधिक! लोफर्सपासून कोल्हापूरीपर्यंत सर्व प्रकारच्या चामड्याच्या चप्पल जास्तीतजास्त वर्ष टिकाव्यात, त्या नव्यासारख्या दिसाव्यात असं तुम्हालाही वाटत असणार, त्यासाठी पुढील घरगुती उपायांची मदत घ्या.

चामड्याचे बूट किंवा सॅण्डल्स सतत एखाद दोन ठिकाणी दुमडले गेल्याने तेथील चामड्याला घडी पडून हळुहळू तिथे चीर पडू लागते. पुढे त्याच ठिकाणी धूळ साचून चामड्याची चमक निघून जाते. अशा चप्पलांचे देखणेपण विरताच त्या वापरातून बाद कराव्या लागतात. असे होऊ नये म्हणून वरचेवर त्यांची स्वच्छता करायलाच हवी.

प्रथम लेस किंवा सॅण्डलचे बक्कल निघणारे असल्यास ते काढून ठेवावे. म्हणजे पुढील सफाई दरम्यान ते अडथळा बनणार नाही. त्यानंतर दमट कपड्याने बूट आतून बाहेरुन पुसून घ्यावेत. असे केल्याने वरच्यावर चिकटलेले धुळीचे बारीक कण निघून जाण्यास मदत होईल. तसेच, बूटाचा सोल किंवा सॅण्डलचे हिल्स स्वच्छ करण्यास विसरु नये. कपडा दमट असला, तरी चामडे व्यवस्थित कोरडे करुन घ्यावे. नंतरच, पुढील प्रक्रियेकडे वळावे.

थंडीच्या दिवसात आपल्या वापरातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पेट्रोलिअम जेली. जे कार्य ती आपल्या त्वचेसाठी करते, तेच कार्य चामड्यासाठीही! म्हणूनच, मऊ कपड्यावर अगदी जराशी पेट्रोलिअम जेली घेऊन ती बूटांवर चोळावी. सर्व बाजूंनी पेट्रोवलिअम जेली लावून झाल्यावर बुटावर कुठेही अतिरिक्त जेली राहणार नाही याची काळजी घ्यावी. नाहितर तेथील चामडे नरम पडेल किंवा तिथे धूळ जमा होईल.

केसांच्या आरोग्याची काळजी घेणारे हेअर कंडीशनर सॅण्डल्सवरील चामड्यासाठीही उपयुक्त ठरते. हे देखील थोड्या प्रमाणात मऊ कापडावर घेऊन सॅण्ड्लसवर चोळावे. ते चामड्यामध्ये थोडे मुरेल याची काळजी घ्यावी. इथे ऑलिव्ह ऑईल किंवा केळ्याची सालेही वापरु शकता. केळ्याची साले ऐकून विचित्र वाटेल, पण ते ख-या अर्थाने चामड्यासाठी उत्तम कंडीशनरचं काम करतं. ही साल आतील बाजून चामड्यावर घासावी. नंतर, सुक्या फडक्याने बूट पुसून घ्यावा. जुने दिसू लागलेल्या चामड्यास टवटवीतपणा बहाल करणा-या वरील उपयांना जरुर आजमावून पाहा.

चामड्याच्या बूटांची गेलेली रया पुन्हा आणताच, आता बूट किंवा ते सॅण्डल चमकवायला हवेत ना त्यासाठी पुढील पद्धत वापरा.

बेकींग सोडा आणि पॅरास्कॉईड हे दोन्ही जिन्नस समप्रमाणात एकत्र करुन तयार केलेली जाडसर पेस्ट हळुवार बूटांवर चोळावी, यासाठी टूथब्रशचा वापर करता येईल. थोडावेळाने सुक्या फडक्याने बूट पुसून घ्यावे.

बूटांच्या प्रमापोटी इतकी खटपट केल्यानंतर चांगले परिणाम तर दिसणारच! जुनाट दिसू लागलेले बूट पुन्हा त्यांच्या मूळ रंगात आलेले दिसतील. चामड्याच्या चप्पलांचा तोरा मिरवण्यासाठी आता तुम्ही तयार आहात, हे त्यांची चमकच तुम्हाला सांगले बरं!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares