bounced chk banner

‘चेक बाऊंस झाला’, पुढे काय….?

बॅंकेचे व्यवहार वाटतात फार कठीण, पण त्यातील बारीक सारीक बाबी नीट समजून घेतल्या तर किचकट वाटणारी बॅंकेची कामे सहज करता येईल. बरेचदा रोख रक्कमेपैक्षा चेकचा पर्याय स्विकारला जातो. चेकचा व्यवहार जितका सोयिस्कर, तितकाच जोखमीचाही आहे. जसे की चेक बाऊंस होतो किंवा लिहीण्यातील चुकीमुळे तो परत येतो. चेकवर मोठी रक्कम असल्यास घाबरुनही जायला होते. म्हणूनच, अशी समस्या उद्भवल्यास चेक साधारण कुठल्या कारणांनी बाऊंस होतो, तसेच असे झाल्यास काय करावे याविषयी थोडे मार्गदर्शन-

  • खातेधारकाने केलेली सही चुकूची असेल किंवा खात्यावरील मुख्य सहीशी मिळती जुळती नसल्यास चेक बाऊंस होतो.
  • चेकवर खाडाखोड झाल्यास किंवा चेकची तारीख उलटून गेल्यानंतर चेक बॅंकेत सादर केल्यास चेक बाऊंस होऊ शकतो.
  • तसेच, चेकवर नोंदविलेल्या रक्कमेइतके पैसे बॅंकेत नसल्यास चेक बाउंस होऊन, चेक देणा-यास दंड लागू होतो.
  • चेक बाऊंस झाल्यावर चेकधारकाशी संपर्क साधून, त्यास याविषयी कल्पना द्यावी. चेकधारकाने चुकू कबूल करत सकारात्मक प्रतिसाद दिला, तर सांमजस्याने हा प्रश्न सोडवता येईल. जर, चेकधारकाने योग्य तो प्रतिसाद दिला नाही, तर त्यावर कारवाई करता येऊ शकते. तसेच, त्यास दंडही बसतो. चेकवरील आकड्यानुसार दंडाची रक्कम ठरते.
  • चेक बाऊंस झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत चेक देणा-या व्यक्तिस किंवा कंपनीस तशी नोटीस द्यावी.
  • संबंधित व्यक्तीकडून अर्ज मिळाल्याची प्रत घ्यावी. पुढील कारवाईसाठी ही कागजपत्रे उपयोगी
    ठरतात.

वरील माहितीच्या आधारे, चेक बाऊंस होण्याच्या समस्येला धीराने सामोरे जाता येईल. चला तर, हा माहितीपर ब्लॉग नक्की शेअर करा आणखी वाचकांसाोबत!

More Articles
Designed and Developed by SocioSquares