Checkbank (1)

चेक भरताना होणा-या चुका!

पैशांचा व्यवहार हा आपल्या जगण्यातला अविभाज्य भाग झाला आहे. त्यात चेकने व्यवहार तर वरचेवर होतच असतात. अगदी सहजपणे केला जाणाऱ्या व्यवहारात थोडीशी जरी चूक झाली तर मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या काही गोष्टी जरूर लक्षात घ्या:

१. रिकाम्या चेकवर स्वाक्षरी करू नका
नाव, दिनांक असे कोणतेही तपशील चेकवर नमूद न करता रिकाम्या चेकवर स्वाक्षरी करून ठेऊ नये. असा चेक जर दुसऱ्या कोणाच्या हाती लागला तर त्याचा दुरूपयोग होऊ शकतो.

२. चेकवरची रक्कम
चेकवर रक्कम लिहिल्यानंतर बाजूला ‘/-‘ असे चिन्ह लावा. जेणेकरुन त्यानंतर रकमेची संख्या वाढवण्याची शक्यता नसते.

३. ओव्हररायटिंग टाळा
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार चेकच्या रकमेमध्ये,नावामध्ये, स्वाक्षरीमध्ये कुठेही खाडाखोड किंवा ओव्हररायटिंग झाले तर तो चेक ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे चेकवर सगळे तपशील अगदी सावधगिरीने भरा.

४. खात्यात पुरेशी रक्कम असावी
जर तुम्ही कोणाला चेक देत असाल तर तेवढी रक्कम तुमच्या बँक मध्ये आहे ना याची खात्री करून घ्या. चेक जर बाऊन्स झाला तर आपल्या खात्यातुन काही रक्कम दंड म्हणून कापली जाते तसेच यावर चेक डिसऑनर होणं हा एक गुन्हा ठरतो. समोरची व्यक्ती आपल्यावर गुन्हा दाखल करू शकते.

५. क्रॉस चेक सर्वात सुरक्षित
चेक क्रॉस करून त्यावर अकाउंट पेयी ओन्ली A/C Payee Only असं लिहून चेक द्यावा म्हणजे तो सुरक्षित असतो.

चेकने व्यवहार तसा खूप सोपा आहे ;पण या सोप्या गोष्टींबाबत मोठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares