super women banner

जागृतीच्या मैत्रिणींसाठी ‘नववर्ष संकल्प’!

मैत्रिणींनो, नववर्षाच्या शुभमुहूर्तावर मनाशी एक खूणगाठ पक्की बांधायला हवी. घरातल्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या काळजीपोटी सा-याजणी भरपूर धावपळ करतात. घरकाम सांभाळून नोकरी करणा-या कित्येकींना तिची दिवसागणिक न होणारी प्रगती लक्षातच येत नाही. जग वेगासोबत पळतय आणि स्वत:कडे लक्ष देणा-या मैत्रीणी मात्र कित्येक वर्षानंतरही जैसे थेच! यावर उपाय एकच, ठरवून, जाणून बुजून यंदा पुढील संकल्प करायलाच हवेत.

स्ववेळ-

गृहिणी असो वा नोकरी करणारी स्त्री. ती महिनोनमहिने विविध जबाबदा-यांत इतकी व्यग्र असते, की स्वत:च्या वैयक्तिक विकासाकडे लक्ष देण्यास तिला पुरेसा वेळच मिळत नाही. लग्नानंतर सणसोहळे, नातेवाईक, मुलांचे संगोपन करण्यात सगळ्या मैत्रिणी गढून जातात आणि छंद, आवड, कलाकुसर करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी, शाळाकॉलेजचे स्वच्छंदी पुन्हा हवेहवेसे वाटतात. काय कराव यासाठी? तर मनाशी निश्चय करावा, की लग्नानंतर वाढलेल्या जबाबदा-यांच्या ओझ्याखाली दबून न जाता, “मी दिवसभरातून किमान एक तास स्वत:साठी राखीव ठेवेन.”

सोशल जग –

आपल्या सा-यांवरच नवतंत्रज्ञानाचा प्रभाव आहे. क्षणार्धात जगाच्या दुस-या टोकावर असणा-यांशी संपर्क साधता येतो, तासनसात आप्तेष्टांशी गप्पाही मारता येतात. एका क्लिकवर जगभर भ्रमंती करता येते. या सा-यामुळे जग जवळ आलंय, पण आपण स्वत:पासून दूर गेलोयत. आंतरसंवाद साधणं अशक्य झालयं. नव्या वर्षी हाच संवाद पुन्हा सुरु करुया. यासाठी मेडीटेशनची, योग साधनेची मदत घेता येईल. एकूणच दिवसभरातून ठरवून काहीवेळ ऑफलाईन जायला हवं आणि सुरु करायला हवा स्वसंवाद! सोशल मिडीआवरील व्हिडीओज्, फोटोज्, मेसेजेस, पाहण्यात तासनतास सहज जातात. त्यापलिकडे जर स्वत:त थोडं डोकावून पाहिलं तर ख-या अर्थानं दिवस सार्थकी लागेल.

आरोग्य मंत्र –

दैनंदिन जीवन अधिक सुखकर करण्यासाठी मेडीटेशनने मनाची तंदुरुस्ती राखता येईल. मात्र, दिवसभराच्या धावपळीत शरीराने साथ द्यावी, ते थकून जावू नये म्हणून थोडा व्यायामही करायला हवा. मुलांची, नव-याची तब्येत सांभळताना तू स्वत:कडे मात्र दुर्लक्ष करतेयस. तेव्हा, नववर्षाचा मुहूर्त साधत लगेचच तयारीला लागा आणि तन्ज्ञांच्या मार्गदर्शनाने योग्य ते व्यायामप्रकार करण्यास सुरुवात करा. व्यायामला डाएटची जोड द्यायला हरकत नाही, मात्र तिथेही तन्ज्ञांचा सल्ला घेण्यास टाळाटाळ करु नये.

शिक्षण –

मुलांचा अभ्यास नेहमीच घेता, मात्र नोकरी, लग्नाच्या गराड्यात उच्चशिक्षण घेण्याचे स्वप्न राहून गेले असेल, तर ते या नव्या वर्षी पूर्ण करायला घ्याच. संसाराचा डोलारा सावरताना तुम्हीही घरच्याघरी अभ्यास करत पदवी किंवा पदवीत्युर शिक्षण पूर्ण करु शकता. तसेच, आवडीच्या क्षेत्रात नवनवे कोर्सेस करत त्याचा स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उपयोग करता येईल. त्याच बळावर लघुउद्योगाचे स्वप्न साकार करता येईल. आता, तर तुमच्या व्यवसायाला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झी मराठी देखील सज्ज झालेय. www.homeminister.com या नव्या पोर्टवर तुम्ही तुमचा व्यवसाया रजिस्टर करु शकता. ज्यामुळे, तुमचा व्यवसाय नव्या व मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचेल. चला तर मग, लागा तयारीला! नववर्षी काही मौलिक वेळ स्वत:साठीही राखीव ठेवा आणि स्वप्रगतीला अग्रस्थान द्या.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares