Banner 01 (1)

जुन्या साड्यांचा फॅशनेबल उपयोग!!

जुन्या साड्या बोहारणीला देऊन त्या बदल्यात एखादी कढई, कॉपर बॉटमचं भांडं किंवा प्लॅस्टिक टब घेण्याचा व्यवहार तुम्हाला नक्कीच ठाऊक असले. पण, या बोहारणीच्या अटीही फार! किमान सात ते आठ साड्यांच्या बदल्यात एक लहानस भांडं मिळतं. त्यातही साडीला कुठेही छिद्र नसावे, ती विटलेली व अस्वच्छ नसावी हे त्या स्वत: तपासून घेतात. आता, अशी नेसण्याजोगी असलेली साडी कुणाला देऊन टाकण्यापेक्षा, तिचा जरा निराळा वापर केला तर!! जसं टाकाऊतून टिकाऊ, तसं जुन्या साड्यांची कलाकुसर करु!
१. Lamp shada_04
धोती – नव्या जुन्याच्या ट्रेंडमध्ये फॅशन जगतातील धोतीचे क्रेझ आणखी काही वर्षे असेच कायम राहीलसे वाटते. प्लेन रंगातील धोतीपेक्षा तरुणाईची पसंती प्रिंटेड धोतीजना आहे. तेव्हा एखादी जुनी प्रिंटेड साडी असेल, तर तिच्याकडे थोडं ‘धोती’ नजरेने पाहा व तुमच्या कलेक्शनमध्ये या धोती फॅशनला समाविष्ट करा.

२. Banner 1
वन पीस – प्रोफेशनल लूकसाठी प्रसिद्ध असणारा वनपीस, शक्यतो गडद व नेमक्या रंगांत ब-याचदा पाहायला मिळतो. इथे काठापदराच्या साडीचा वापर करुन दिलेल्या फ्युजन लूकमध्ये वनपीस अधिक उठावदार दिसेल. या वनपीसने पांरपारिक लूक धारण केला असला, तरी त्याचे पाश्चात्य ढब कायम आहे.

३. Lamp shada_05
जॅकेट्स – कुर्ता, टॉप – टिशर्ट यावर शॉर्ट जॅकेट घालण्याचा फंडा आजमावू शकता जुन्या साड्यांच्या मदतीने! कोटचा पर्यायही उपलब्ध असून सिल्क किंवा कॉटन साडीचा वापर करता येईल.

४.Banner 2
उश्यांची अब्रे – उशांचा आकार चौकोनी, गोल, आयताकृती कसाही असतो. पण, घरच्याघरी उशांची कव्हरे शिवताना आकाराचे कुठलेही बंधन नसते. साडीवरील बुट्टे, बॉर्डरचा वापर करुन मस्त डिझाईन्स बनवता येतील. उश्यांच्या सेट मधील एखाद्या उशीस पदरावरील भरगच्च डिझाईनचे कव्हर शिवून हायलाईट करता येईल.

५. Lamp shada_02
शेड लॅम्प – अगदी सर्वसाधारण लंबगोल आकाराच्या लॅम्पशेडवर इरकली साडी किंवा नारायण पेठ साडीची प्रिंट छान शोभून दिसते. लॅम्पशेडचा हा पारंपारिक लूक तुम्हाला नक्की आवडेल.

६.Lamp shada_03
पडदे – खिडक्यांचे पडदे बदलताच, संपूर्ण खोलीची रंगसंगीत निराळी वाटू लागते. कारण, सूर्यप्रकाश पडद्यांवर पडला, की खोलीभर त्याच पडद्यांचा रंग पसरतो. घरात असे पडद्यांचे दोन तीन जोड असतात. आता त्यात, वेगवेगळ्या सांड्याचे चौकोन जोडून तयार केलेल्या पडद्यांचाही समावेश करा. एकाचवेळी भरपूर रंग व नक्षीकाम सूर्यप्रकाशात सुरेख दिसेल.

७.Lamp shada
टेबल क्लॉथ – पाश्चात्यांचं डायनिंग टेबल आपण आपलसं केल, मात्र त्यास सजवताना थोडा भारतीय टच देऊया. टेबल क्लॉथ, प्लेट मॅट्स, टेबल रनर हे सारं जुन्या साडंयाच्या रंगाचा अचूक ताळमेळ साधून बनवता येतील.

मैत्रिणींनो, तुम्ही कमेन्टद्वारे सांगितलेले जुन्या साड्यांच्या पुनर्वापराचे पर्याय खरेच कल्पक असून, जुन्या साड्या गरजू व्यक्तिंना देण्याची सवयही प्रशंसनीय आहे. या साड्यांच्या पसा-यातील निवडक साड्या आपल्याला प्रचंड आवडणा-या असतात, ज्या काहीकेल्या टाकून द्याव्याशा वाटत नाहीत. अशा साड्यांतून नक्कीच काहितरी नवं करता येईल. ज्यामुळे, त्या योग्यरित्या वापरल्या जातील व जास्त काळ नजरेसमोरही राहतील.

Image Source : Pinterest

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares