Recycle old saree (1)

जुन्या साड्यांचा फॅशनेबल मेकओव्हर!

फॅशनजगतात किती वेगाने नवनव्या, मोहक पेहरावांचा शिरकाव होतोय. बदलत्या ट्रेंडनुसार आपलेही वॉर्डरॉबमध्ये नव्या फॅशनचा भरणा करणे सुरु असते. तिने काय नवे घातले? हिने काय विकत घेतले?  यावर आपली बारीक नजर नवख्या फॅशनला अनेकदा भुलते, पण मराठीमोळी साडी कायम अव्वल ठरते आणि आवडलेली साडी विकत घेण्याचा मोह आवरता येत नाही. यातूनच, स्वत:चे वैयक्तिक साड्यांचे कलेक्शन तयार होते. नव्या येतात, जुन्या तशाच पडून रहातात. एक साडी खूपदा नेसून झाल्यावर पुन्हा नेसाविशी वाटत नाही आणि आवडती असल्याने बादही करवत नाही. अशा अडचणीत सापडला असाल, तर अशा जुन्या साड्यांवर पुढील प्रयोग करुन पाहा.

वन पीस:

पार्टीवेअर ड्रेसेसमध्ये कमी उंचीचे वन पीस बहुतेकदा ग्लेझ किंवा व्हेलव्हेट कपड्यांमध्ये पाहायला मिळतात. पाश्चात्त्यांच्या वन पीसमध्ये म-हाटी साडीची झलक दिसणे अशक्यच! पण आता शक्य झाले आहे, साडी पॅटर्नमधून तयार केलेला वन पीस खरंच खूप देखणा दिसतो.

Saree reuse (2)

पलाझो:

कुर्ता कुठल्याही लांबी असो, त्यावर कॉटन किंवा नायलॉनची पलाझो तुम्ही ट्राय केलीच असेल. आता, साडीची पलाझो वापरुन पाहा. कुर्ता प्रिंटेड असल्यास त्यावर प्लेन साडीपासून शिवलेला पलाझो घालता येईल किंवा असेच त्याउलट.

Saree reuse (3)

लॉंग ड्रेसेस:

साडीचे लग्न समारंभात घालता येतील इतके सुंदर लॉंग गाऊन शिवता येतात. किनार किंवा पदरावरील डिझाईन वापरुन त्यांना अधिक मोहक बनवता येते.

Saree reuse (4)

जॅकेट्स:

जुन्या साड्यांपासून कुर्ता किंवा जीन्सवर घालता येतील अशी जॅकेट्स बनवता येतील. पॅटर्नमुळे जॅकेटमध्ये एकाचवेळी भरपूर रंगाचा समावेश होतो व काठापदरांचा विविधरित्या वापर करुन जॅकेट्स निराळा लूकही देता येतो.

Saree reuse (1)

वापरात नसलेल्या व कपाटात तशाच पडून असलेल्या साड्यांवर असे फॅशनबल प्रयोग नक्की करुन पाहा. सध्या ही फॅशन ट्रेंडी असून साड्यांच्या मेकओव्हरला तुमच्या वॉर्डरॉमध्ये स्थान द्याच!

Image source – pinterest.com

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares