JOG (2)

जॉगिंगचे आहेत हे काही नियम….

तुम्ही वॉकला किंवा जॉगिंगला जात नसाल, तर उद्यापासूनच निश्चयाने थोडा वेळ यासाठी राखीव ठेवा. नोकरी करणारे असाल, तर सुट्टीच्या दिवशी हा कार्यक्रम पार पाडता येईल. कॉलेजला जाणारे असाल, तर वेळ काढणे जरा जास्त सोप्पे आहे. जॉगिंग करुन, मग कॉलेजला गेलात तर पहिल्या लेक्चरलाही फ्रेश वाटेल व मन छान एकाग्र होईल. जास्त नाही फक्त एक ते दीड तास स्वत:साठी काढायचायं.

व्यायामासाठी सकाळ उत्तम ठरतेच, पण वेळ जमत नसल्यास संध्याकाळ देखील सोयीची ठरेल. कारण ट्रेनचा प्रवास, घरातील कामे, अभ्यास, प्रोजेक्ट्स, क्लासेस या न संपणा-या यादीत व्यायाम कुठेच नसतो, असते ती फक्त दगदग. या सा-याचा अगदी क्षीण येतो, मन थकते, विचारांतील मावळलेला उत्साह परत मिळविण्यासाठी गरज असते, आंतर्बाह्य ताजेतवाने होण्याची. मनाला थोडा स्वतंत्र्य वेळ दिला, की शरीरही येणा-या आव्हानांसाठी सज्ज होते.

हल्ली बिल्डिंग्समध्येच लॉन, गार्डन्स, जॉगिंग ट्रॅक असतात. मन पक्के करुन घरातून बाहेर पडणे तितके बाकी आहे. सोबत, पुढील दिलेल्या टिप्स लक्षात ठेवल्या की झाले, तुमचे जॉगिंग किंवा वॉक योग्य ट्रॅकवर आहे असे समजा….

शूज –
पायात योग्य शूज असणे आवश्यक आहेत. सॅण्डल, चप्पल, स्लिपर असे काहीही घालून बाहेर पडू नये. यामुळे, पायाला त्रास होईलच, कंबर किंवा पाठीचा मणका देखील दुखू लागेल. धावताना किंवा वेगाने चालताना टाचांवर, पायाच्या बोटांवर जोर येणार नाही असे मऊ पॅडींग शूजच्या आतमध्ये हवे. पायाला येणारा घाम शोषून घेण्यासाठी सॉक्स घालावेत. सॉक्समुळे शूजही पायाला वेवस्थीत बसतात.

योग्य रस्ता –
जॉगिंगसाठी निवडलेला रस्ता खडबडीत किंवा चढणीचा नसावा. चढणीवर लवकर थकवा येतो. म्हणून, सपाट व हवेशीर परिसरच निवडावा. दुतर्फा झाडांची किमया साधलेले रस्ते आता दुर्मिळ झालीत, पण मानवनिर्मित बगीचे आहेत ते आरोग्यदायी ठरतील. निवडलेली जागा शक्यतो घरापासून जवळ असावी.

पाणी –
जॉगिंग किंवा वॉक करतेवेळी शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास, डिहायड्रेशनचा त्रास होऊन दम लवकर लागतो व फ्रेश वाटण्याऐवजी आणखी अशक्त वाटते. असे होऊ नये म्हणून जॉगिंगला जाताना कोमट पाण्याने भरलेली बाटली घ्यावी. तहान लागल्यावर घोट घोट पाणी प्यावे.

कपडे –
सैल व सुती कपडे घालावेत. तसेच, सुती नॅपकीन जवळ बाळगावा, चेह-यावर घाम जास्त वेळ राहू देऊ नये. घामामुळे त्वचेची जळजळ होऊन पुरळ वैगरे उठू नये म्हणून, वेळोवेळी घाम टिपून घ्यावा.

संगीत –
मन एकाग्र करणारी संगीतासारखी थेरपी नाही. व्यायामाला कायमच संगीताची जोड दिली जाते. पायाला गती देण्यासाठी जॉगिंगला जाताना एमपीथ्री प्लेअर नक्की घेऊन जा. हा वैयक्तिक वेळ पूर्णपणे अनुभवायचा, तर व्हॉट्सअॅप, फोन कॉल्सना थोडावेळ दूरच राहूद्या. चालताना कंटाळा येऊ नये म्हणून मैत्रिणीची सोबत असेल तर छानच, पण जॉगिंग या विषयावर नुसत्या गप्पाच रंगतील. अस होऊ नये म्हणून, मैत्रिण सोबत असतानाही आपली संगीत थेरपी आजमावे.
dge
चला तर, अशाप्रकारे जॉगिंग किंवा वॉक करताना स्वत:ची अशी काळजी घ्या व तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हेही सांगा. तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेन्टबॉक्समध्ये लिहा नक्की….

More Articles
Designed and Developed by SocioSquares