NAIL ART (2)

झटपट होणा-या ‘नेल आर्ट’ डिझाईन्स!!

झटपट होणा-या ‘नेल आर्ट’ डिझाईन्स!!

दिसायला अगदी लहान व नाजूकशी नखे, नेलपेंटने रंगताच देखणे रुप धारण करतात. त्यात हल्ली भर पडलीये ट्रेंडी नेलआर्टची! नखांवर किचकट नक्षीकाम करण्याची कला तशी अवघडच, पण ब्रश, पिन्ससारखे साहित्य वापरुन हे किचकट काम करीत नखे सजवताना छान काहितरी क्रिएटीव्ह केल्याचा आनंद मिळतो. असे नेलआर्ट करण्याची हौस तर आहे, पण त्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मात्र नाही. या समस्येमुळे अडून रहावे लागू नये, म्हणून घेऊन आलोय करायाला सोप्प्याशा नेलआर्ट डिझाईन्स!

1. फक्त रेषांच्या वापर करुन अशा नेलआर्ट डिझाईन्स साकारता येतील.

nail banner A

2. अशाप्रकारे नखांवर एखाद दोन डॉट्स देऊनही सुंदरसा परिणाम साधता येईल.

nail banner B

3. कपड्यांवरील प्रसिद्ध पोलका डॉट्सचा असाही नेलआर्ट अंदाज!

nail banner C

4. उभ्या आडव्या रेषांचा अचूक मेळ साधून असा हटके लूकही सहज देता येईल.

nail banner D

5. अगदी नेमक्या रेषा, ठिपके काढत प्राणी किंवा फुलांचे मोहक आकार बनवता येतील.

nail banner E

कुठलेही निराळे साहित्य न वापरता, घरबसल्या सहज करता येतील अशा सोप्प्या डिझाईन्स ट्राय करुन पाहा! नखांना सुंदर बनविणारी ही रंगरंगोटी तुम्हाला कशी वाटली, ते नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांद्वारे,

Image Source – Pinterest

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares