diet banner

डाएटमध्ये फक्त ‘सॅलेड’ खाणे घातक, कारण…

बारीक होण्यासाठी डाएट करणा-या असंख्य मैत्रिणी तुम्हालाही ठाऊक असतील. लठ्ठपणा कमी करण्याचे अगदी मनावर घेऊन तेलकट, तिखट, मांस-मच्छी, कोल ड्रिंक्स, चिप्स, आईस्क्रिम, चहा, कॉफी सारख्या ब-याच पदार्थांना ‘वर्ज्य’ म्हणतात, डाएटवर जातात आणि फक्त ‘सॅलेड’चा खुराक सुरु करतात.

सॅलेड किंवा हिरव्या पालेभाज्या नक्कीच पौष्टिकतेने परिपूर्ण आहेत. मात्र, अचानक इतक्या भरपूर प्रमाणात मिळालेली जीवनसत्त्वे पचविण्याची क्षमता शरीरात नसते. कच्च्या भाज्यांचे नीट पचन न झाल्याने, पचनसंस्थेचे विकार उद्भवतात. म्हणून, वय व शरीराच्या वजनानुसार आवश्यक तितके अन्नपदार्थ योग्य प्रमाणात व दिवसभरात ठराविक कालांतराने घ्यावेत. शरीरात स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वांचे संतुलत साधण्याचा उद्देश डाएटमागे हवा. कारण, प्रत्येक अन्नपदार्थ शरीरासाठी उपयुक्त ठरतात.

फळांच्या रसाऐवजी फळेच आवर्जून खावीत, कारण फळांच्या रसात साखरेचे प्रमाण अधिक असते व फायबरच अभाव असतो.  दही व दूधाचेही सेवन करावे, फक्त ते मलईयुक्त नसेल याची काळजी घ्यावी. डाएटला व्यायामाची जोड द्यावी, यामुळे स्नायुंना बळकटी मिळते. त्वचा निश्तेज न वाटता चमकदार रहाते. अशाप्रकारे, पदार्थांचे सेवन करताना थोडी काळजी घ्यावी, त्याचे प्रमाण कमी करावे.

डाएटमुळे आहारत झालेल्या बदलांमुळे डोकेदुखी, पोटदुखी, अपचनासारखे त्रास जाणवू लागतात. यासाठी हळुहळु आहारात बदल करणे गरजेच आहे. म्हणून, कुठलेही डाएट करण्याआधी तन्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अनुभवी व्यक्तिंच्या मार्गदर्शनानुसार स्वत:चा डाएट प्लॅन तयार करावा.

More Articles
Designed and Developed by SocioSquares