be healthy (2)

तब्येतीकडे दुर्लक्ष कराल, तर ‘हे’ परिणाम भोगाल!

घरातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याबाबत दक्ष असणारी त्या घरातली स्त्री स्वत:च्या स्वास्थ्याकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसते. इतरांची तब्येत सांभाळताना तिच्याकडून एक चूक होईल तर शप्पथ. औषधाच्या वेळांपासून पाळायच्या पथ्यापर्यंत सांर हिला तोंडपाठ असतं आणि स्वत: आजारी पडली की डॉक्टरकडे जाण्यास टाळाटाळ करणं देखील हिलाच छान जमतं. प्रत्येकवेळी घरगुती औषध घेऊन वेळ मारु नेण्याची चूक तुम्हीही करत असाल, तर वेळीच सावध व्हा. घरगुती औषधे गुणकारी आहेत, मात्र काहीवेळा दुखण्या मागील कराणाचा फक्त अंदाज बांधून चालत नाही, आजाराचे अचूक निदान होणे गरजेचे असते. शरीराच्या दुखण्याबद्दल कुणाकडे न बोलून होणारा त्रास सहन करणे अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरते.

स्त्री-शरीरात प्रजननाची क्रिया पार पडत असल्याने, वयानुरुप शरीर कुठल्यानाकुठल्या बदलाला सतत सामोरे जात असते. मासिकपाळी सुरु झाल्यापासून बंद होईपर्यंतच्या काळ, तसेच गरोदरपणात उद्भवणा-या आजारांवर वेळीच औषधौपचार व्हायला हवेत.

भारतीय स्त्रियांमध्ये उच्चरक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. अतिरक्तदाबमुळे फिट येणे, मेंदूत रक्तस्त्राव होण्याची शक्यता बळावते. बदलत्या जीवनशैलीमुळे ह्रदविकाराच्या समस्या वाढल्यात, कॉलेस्ट्रॉलचे कमी करण्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

मधुमेहाचे रुग्णही दिवसागणिक वाढतायत. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर मुख्यत्वे मधुमेहाची लक्षणे दिसू लागतात.

मासिक माळीतील अनियमिततेमुळे अतिरक्तस्त्राव होणे ही सामान्य समस्या असली, तरी असे वरचेवर घडत असल्यास वेळीच दक्षता घ्यायला हवी. त्यामागे, फारब्रॉईडच्या गाठी किंवा हार्मोन्सचे असंतुलन, गर्भाशयातील आतील आवरणाला सूज येणे अशा शक्यता नसल्याची खात्री करुन घ्यावी. योग्य वेळी उपचार न केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन नकळत आरोग्याचे नुकसान होते.

रजोनिवृत्तीनंतर होणा-या रक्तस्त्रावाकडेही दुर्लक्ष करु नये. मॉनोपॉझनंतर रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये दिसून येते. गर्भाशयाच्या कॅन्सर असण्याच्या शक्यतेला पूर्णविराम देण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास दिरंगाई करु नये. तसेच, मोनोपॉझनंतर मंद गतीने हाडांची झीज होण्यास सुरुवात होते. त्यामुळे, समतोल आहार घ्यावा, शरीराला कॅल्शियम देणा-या अन्नपदार्थांना प्राधान्य द्यावे.

वय, वजन, स्नायूंचा कमकुवतपणा यामुळे संधीवाताचा त्रास बळावू शकतो. ज्याला फक्त मलम लावणे उपयोगाचे नाही, तर डॉक्टरी इलाजाचीच गरज आहे.

कुटुंबामधील सदस्यात कॅन्सरचे निदान झाले असल्यास, कॅन्सरतन्ज्ञांचा सल्ला घेऊन आनुवंशिक तपासणी करुन घ्यावी. स्त्रियांमध्ये स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, अंडाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक दिसते.

संसाराचा ताळेबंध बांधताना काटकसरीचं गणित मांडवच लागतं, पण यात आरोग्यासाठी लागणा-या खर्चाची सरमिसळ करु नये. पैसे वाचवण्याच्या नादात लहान मोठ्या दुखण्यांचा वेळीच बंदोबंस्त केला नाही, तर हेच आजार भविष्यात मोठं रुप धारण करुन येतात आणि ध्यानीमनी नसणारा खर्च करायला भाग पाडतात. तेव्हा, आरोग्याकडे कानाडोळा न करण्याची चांगली सवय झी जागृतीच्या प्रत्येक मैत्रिणीने स्वत:ला लावून घ्यायचीय.

यापैकी काही मैत्रिणी जाणत्या झाल्यात…! त्यांचं कौतुक करायलाच हवं. घरच्यांसोबत स्वत:च्या तब्येतीला जपणे त्यांना छान जमलेय. कुणी आपल्याकडे लक्ष देवो न देवो. हट्टानं डॉक्टरकडे घेऊन जावो न जावो. त्या आपणहून वेळोवेळी आरोग्याची तपासणी करुन घेतायत, योगा, व्यायाम, नियमित चालायला जाणं अशा सवयींना त्यांनी आपलसं केलंय. तन्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य आहार घेण्यावर भर देतायत. किती छान, स्वत:ला स्वत:ची साथ! यापुढे प्रत्येकीनं असंच गुणी मुलीसारखं वागण्याचा निश्चय करायचाय, कराल ना?

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares