doctor banner

…. तर आजार जाईल पळून

‘उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती’ पण आजकाल आपल्याकडून तब्येतीकडे दुर्लक्ष होते. त्यातही तब्येतीच्या छोट्या छोट्या कुरबुरींकडे दुर्लक्ष केले जाते. यासाठी कोणत्याही आजाराचे प्रतिबंधात्मक निदान होणे आवश्यक आहे. स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहे त्यामुळे शारीरिकदृष्ट्या ती सक्षम असायलाच हवी .

आजार बळावण्यापासून प्रतिबंधात्मक निदान आपला बचाव करू शकतो. त्यामुळे कोणत्याही आजाराबद्दल शंका असेल तर तातडीने चेक अप केले पाहिजे.

पुढे जाऊन आजार बळावल्यावर उपचार खर्च हा मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो त्यामुळे आधीच त्याबद्दल सावध राहिलेले कधीही चांगलेच. मधुमेह, रक्तदाब यांची नियमित तपासणी करून घेणे हितकारक आहे. जर याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले तर त्यावर तात्काळ उपाय करणे सुलभ होते.

तात्काळ निदान झाले तर काही आजार कायम स्वरूपी बरे होऊ शकतात. प्रत्येक आजराप्रमाणे प्रतिबंधात्मक चाचण्या वेगवेगळ्या असतात त्यानुसार आपल्या फॅमिली डॉक्टरकडून वेळोवेळी सल्ला घ्या.

More Articles
Designed and Developed by SocioSquares