HAIR (1)

केसांचे गळणे थांबवतील ‘हे’ घरगुती उपाय!

हल्ली कुठल्याही वयात केस गळण्याची समस्या उद्भवत असून, तरुण वयोगटात याचे प्रमाण अधिक दिसते. कामाचा व्याप व अपुरे पोषण यामुळे केसांची निगा राखणे दुरुच, साधे आठवड्यातून एकदा तेलही लावले जात नाही. केसांचा पोत न जाणून घेता कुठलाही शॅम्पू, कंडीशनर वापरल्याने केसांचे आरोग्य बिघडते. ते अधिक राठ व निश्तेज दिसून गळण्यास सुरुवात होते.

  • केस गळण्याची समस्या असणा-या व्यक्तिंनी ओल्या केसांना रगडून पुसू नये. प्रथम केस नीट सुकू द्यावेत मगच त्यावरुन कंगवा फिरवावा.
  • केसांना पुरेसा रक्तपुरवठा न होण्यानेही केस गळू शकतात. यावर शीर्षासन हा सर्वोत्तम उपाय ठरतो.
  • पातळ केसांना ऑलिव्ह तेल लावावे, तसेच मोहरीच्या तेलात मेथी गरम करुन लावल्यास केसांचा पोत सुधारण्यास मदत होते
  • केसांसाठी नारळाचे दूध उपयुक्त ठरतो. नारळाचे दूधाने केसांना व केसांच्या मुळांना मसाज करावा. रात्रभर तसेच राहू द्यावे व दुस-या दिवशी सकाळी केस धुवावेत.
  • केस गळण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी जास्वंदही उपयोगी ठरते. तीळ अथवा खोब-याच्या तेलात जास्वंदीची फुले कुटून घालावीत. हे मिश्रण केसांना तासभर लावून ठेवावे. नंतर सौम्य शॅम्पू वापरुन, थंड पाण्याने केस धुवून घ्यावेत.
  • अंडे देखील केसांसाठी फायदेशीर असून, अंड्यातील पांढरा भाग १ टि.स्पू. ऑलिव्ह तेलात मिसळून, तयार झालेले मिश्रण केसांना लावावे. साधारण १५ ते २० मिनिटांनी शॅम्पू वापरुन केस धुवावेत. केस धुताना शक्यतो थंड पाणी वापरावे.

 

जर तुम्हीही केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर वरील उपाय नक्की करुन पाहा आणि तुमच्याकडे काही घरगुती उपाय असल्यास तेही लिहा खालील कमेन्टबॉक्समध्ये, झी मराठी जागृतीच्या मैत्रिणींसाठी!

More Articles
Designed and Developed by SocioSquares