Earphone BANNER

तर, इअरफोन दिर्घकाळ टिकतील….

मोबाईल इतकेच क्षणोक्षणी उपयुक्त ठरणारे इअरफोन संगीतप्रेमींसोबत सारेच नियमित वापरतात. प्रवासात इअरफोन सोबत नसतील, तर जीव अगदी नकोसा होतो. दिसायला लहानसे असणारे हे यंत्र तितकेच नाजूकही आहे. त्यामुळे बरेचदा महागडे इअरफोन्सही महिन्याभरात खराब झाल्याचे तुम्हीही अनुभवले असेल. आणि एकदा बिघडले की इतर यंत्रांसारखे पुन्हा दुरुस्तही करुन मिळत नाहीत. त्यामुळे पुन्हा नवीन घेण्याशिवाय पर्याय मिळत नाही. इनरफोनच्या खरेदीवर होणारा सततच्या खर्च थांबायचा असेल, तर हे यंत्र जरा सांभाळून वापरायला हवे.

इअरफोन विकत घेताना सोबत इअरबड कव्हर मिळते, या कव्हरशिवाय इअरफोन वापरणे कानासाठी धोकादायक ठरते. आवाज थेट कानाच्या पडद्यावर आदळल्याने कानाला दुखापत होऊ शकते. तेव्हा इअरबड कव्हर हरवल्यास नवीन विकत घेण्याचा कंटाळा करु नये. हे कव्हर वेळोवेळी स्वच्छ करावे. इअरफोनमध्ये धुळीचे बारीक कण जाऊन ते लवकर बिघडू शकतात.

इअरफोनचा वापर झाल्यावर ते कसेही गुंडाळून न ठेवता इअरफोन कव्हरमध्येच ठेवावेत. बाजारात अनेक फॅन्सी कव्हर्स माफक दरात उपलब्ध आहेत. इअरफोनमधील नाजूक वायरींग लवकर खराब होते. ब्रॅन्डेड किंवा कामचलाऊ  कंपनी कुठलीही असो, इअरफोनची नीट काळजी घेतल्यास ते नक्कीच थोडे जास्त टिकतील. तसेच, त्याच्या गुंतलेल्या तशाच न ठेवून देता. वापरण्यापूर्वी नीट सोडवून घ्याव्यात.

याचसोबत दुस-यांचे इअरफोन्स वापरणे शक्यतो टाळावे. सहज न दिसणा-या कानामध्ये झालेल्या जखमेचा संसर्ग इअरफोनमुळे पसरु शकतो. स्वत:च्या आरोग्यासाठी इतकी काळजी घ्यायलाच हवी. इअरफोन दीर्घकाळ कार्यरत रहावेत यासाठी वरील टिप्सचा अवलंब देखील करायला हवा.

More Articles
Designed and Developed by SocioSquares