color band (1)

खोल्यांची रंगसंगती ठरवताना…!

घरासाठी बारीक सारीक वस्तूंची खरेदी करतानाही आपण फार सतर्क असतो. आपल्या होम स्वीट होमला शोभून दिसतील अशाच अचूक गोष्टी आपण निवडतो. ज्यातील महत्तम भाग घराचा आंतर्बाह्य रंग! सध्याची स्टाईल वैगरे विचारात घेतली, तरी बघताच मनाला प्रसन्नता देणारी निराळीशी रंगसंगती आपल्याला प्रत्येकाला हवी असते. साधारण मुख्य रंग तीन ते चार, पण याच रंगांच्या भन्नाट शेड्स किंवा टिंज उपलब्ध असल्याने आपल्यासमोर भरपूर पर्याय असतात. जितकी जास्त शोधाशोध करतो तितकेच जास्त गोंधळून जातो. म्हणूनच देत आहोत काही टिप्स, ज्या तुम्हाला तुमच्या घरासाठी परफेस्ट रंग निवडताना उपयुक्त ठरतील.

लहान घरही मोठ्या कल्पकतेने सजवता येते. लहान खोलीसाठी फिकट रंग निवडावेत. ज्यामुळे प्रकाश भिंतींवरुन परावर्तित होऊन खोलीभर पसरतो व खोलीचे आकारमान मोठे भासते किंवा निवडलेल्या फिकट रंग थोडा गडद करुन, त्याचे उभे पट्टे खोलीतील एका भिंतीवर देता येतील. ज्यामुळे खोलीची उंची कमी भासणार नाही.

हॉल, किचन, बेडरुप अशा खोलीच्या प्रकारावरुन खोलीचे रंग निवडण्यावर भर द्यावा. जसे किचनमध्ये फिकट रंग देणे गरजेचे असले, तरी तेल, मसाले, फोडणीचे डाग भिंतीवर उडून रंग लवकर खराब होतात. यावर उपाय म्हणून फिकट रंगातील टाईल्स किचनमध्ये लावता येतील. यामध्ये डिझायनर टाईल्स निवडल्यास छान ट्रेंडी लूक मिळले तसेच, किचन स्वच्छ करण्याचे कामही सोप्पे होईल.

लहान मुलांची खोली रंगवताना एकाचवेळी भरपूर रंगांचा वापर करण्याची मुभा असते. कार्टुन्स किंवा झाडाफुलांचे देखणे देखावे खोलीतील एका भिंतीवर चितारले, की खोलीचे बदलणारे रुप शोभून दिसते. मुलांना तेलकट खडूने भिंती रंगवण्याची भारी हौस असते. यासाठी भिंतीवरच लहान चौकोनी फळा बनवून घेता येईल. जिथे त्यांना चित्रकलेचा मनसोक्त आनंद घेता येईल किंवा वॉशेबल पेंट वापरता येईल.

बेडरुम मधील रंगसंगती शक्यतो मंद प्रकाश व वातावरणाचे संतुलन साधणारी असावी. खोलीतल एक बाजू टेक्श्चर पेटिंगने रंगवण्याचा पर्याय उपलब्ध आहे किंवा वॉल पेटींगचा वापर करुन संपूर्ण खोलीलाच छानशी थीम देता येईल.

स्वतंत्र्य घर असणा-यांना घराच्या बाहेरील रंगांबाबतही तितकेच चौकस असावे लागते. पांढ-या किंवा फिकट रंगांचा वापर केल्यास ऊन परावर्तित होऊन घराच्या भिंती तापत नाहीत व खोल्यांमधील वातावरण थंड रहाण्यास मदत होते.

अशाप्रकारे, घरासाठी रंग निवडताना वरील टिप्स नीट लक्षात ठेवा व काळजीपूर्वक योग्य तेच रंग निवडा. कारण, घराचे रंग हे घरातील माणसांची ओळख बनतात.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares