BEAUTY (2)

तुमच्या मेकअप किटमध्ये काय काय असतं?

तुम्ही नियमित मेकअप करणारे असलात किंवा नसलात, तरी स्वत:चा असा एक मेकअप किट तयार असणं फार आवश्यक आहे. यामुळे, ऐनवेळी मेकअपच्या सामानाची शोधाशोध होत नाही. मेकअपचं सामान कॅरी करायचं असल्यास तयार किटची पाऊच किंवा पर्स बॅगेन टाकली की काम झाल. प्रत्येक लहान मोठी वस्तू घेतली की नाही हे पुन:पुन्हा तपासण्याचीही गरज नाही. किटमध्ये सगळं आपसूकच येत.

चला तर, अशा अप टू डेट मेकअप किटमध्ये काय काय असायला हवं ते पाहूया. मूळात सौंदर्य प्रसाधनांचे अनेक प्रकार असतात, ज्यात प्रत्येकाचा वापर व वैशिष्ट्य निरनिराळं आहे. पुन्हा त्यात अनेक ब्रॅण्ड्स उपलब्ध आहे. यातून तुमच्या त्वचेला साजेसे प्रॉडक्ट तुम्हाला निवडायचं आहे. मात्र, कुठले प्रकार किटमध्ये असायला हवेत याविषयी जाणून घेऊया.

  1. केलेला मेकअप चेह-यावर दिवसभर व्यवस्थित रहावा म्हणून मेकअपचा बेस लेअर असणारे मॉईच्छराईझर व प्राइमरला किटमध्ये प्रथम स्थान द्या.
  2. त्यानंतर, कंसीलर तसेच, फाऊंडेशन यांचा किटमध्ये समावेश करायला हवा. अर्थात, ते निवडताना त्वचेचा रंग ध्यानात घ्यावा.
  3. आयलाइनर आणि मस्करा हे दोन्ही प्रकार तुमच्यासाठी बिलकूल अनोळखी नाहीत. पर्समध्ये आणि काही असो वा नसो, आयलाइनर असतेच. तेव्हा डोळ्याचे सौंदर्य खुलविणा-या या प्रॉडक्टना विसरुन कसं चालेल.
  4. आता, लिपस्टिक कडे वळूया. सिंपल लाल व न्यूड अशा दोन रंगाच्या लिपस्टिक मेकअप किटमध्ये कायम ठेवाव्यात. पार्टी लूकपासून, साध्या कुर्तीपर्यंतच्या लूकसाठी या दोन्ही लिपस्टिक अचूक ठरतात.
  5. लहानसे आयब्रो पॅलेट किटमध्ये असावे, ज्यात ब्राईट, ग्लिटर, न्यूड असे सर्व रंग सामावले असतील. जेणेकरुन लूकनुसार हवा ते वापरता येईल.
  6. चेह-याचे फिचर्स क्षणार्धात अधिक उठावदार करण्याचे काम ब्लश व हाइलाइटर करतात. फक्त त्यांचा अचूक वापर करणे जमायला हवे. त्यामुळे, मेकअपला पुर्णत्व देणा-या या दोन बाबी आहेत, त्या मेकअप किटमध्ये हव्यातच.
  7. एक ब्युटीब्लेंडर तर कॅरी करावेच. फाऊंडेशन, कंसीलर, ब्लश चेह-यावर व्यवस्थित पसरवण्यासाठी ते उपयोगी ठरते. आपण ब-याचदा बोटाने ही क्रिम्स चेह-यावर पसरवण्याचा प्रयत्न करतो. अशाने बोटांना लागून क्रिम फुकट जातेच, वर कमी अधिक प्रमाणात चेह-यावर उंचवटे दिसू लागतात. सोबत, काही ब्रशेसही ठेवावेत.
  8. शेवटची मात्र फार महत्त्वाची वस्तू म्हणजे क्यू टिप्स तसेच वाईप टिश्यू. मेकअप करताना होणा-या बारीक सारीक चुका किंवा दिवसभरात मेकअपसहित वावरताना लिपस्टिक, लाइनर जरासं पसरल तर तितक हलकेच पुसण्यासाठी क्यू टिप्स उपयुक्त ठरतात आणि मेकअप करण्याआधी व केलेला मेकअप पुसण्यासाठी पाणी, क्लिनझर उपलब्ध नसेल तर वाईप टिश्यूज वापरत येतात.

मेकअप करताना विविध वैशिष्ट्यांनी युक्त अशी भरपूर प्रसाधने वापरली जातात. प्रत्येक प्रकार किटमध्ये समाविष्ट करत गेलो, तर लहान मेकअप बॅगच कॅरी करावी लागेल. त्यामुळे, लहानश्या पाऊचमध्ये मावतील अशी व कधीही कुठेही चटकन मेकअप करुन तयार होण्यासाठी आवश्यक असणा-या वस्तूंचाच किट आपण तयार केला आहे. कसा वाटला नक्की कळवा? अजून या किटमध्ये काय समाविष्ट करायला हवं, असं तुम्हाला वाटतं. तेही सांगा.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares