DIWA (2)

तुम्हाला कुठल्या कारणामुळे दिवाळी आवडते?

‘माझा आवडता सण’ या विषयावर शाळेत जितके निंबध लिहिले जातात, त्यातील बहुसंख्य निबंधांत दिवाळीची अवर्णनीय मज्जा दिसून येईल. लहान थोर सा-यांच्याच आवडीची असणारी दिवाळी! प्रत्येकाला इतकी का आवडतं असेल याची काही कारणे आम्ही शोधून काढलीत. पाहा वाचून पटतायेत का!

  1. सुट्टी आणि बोनस!

फराळ, सजावट, रांगोळी, शॉपिंग अशी दिवाळीची तयारी करताना अभ्यास किंवा शाळा आड येत नसल्याने शाळकरी खूष असतातच! सोबत नोकरदारवर्गात बोनसमुळे आनंद संचोरतो, वर दोन तीन दिवसाची का होईना पण भरपगारी सुट्टी मिळते. असा दुग्धशर्करा योग जुळवून आणणारी दिवाळी कुणाला आवडणार नाही?

  1. सेलिब्रेशन

घराची साफसफाई पासून कंबरकसून घरातले सदस्य कामाला लागतात. दिवाळीसारखं भरभक्कम कारण असल्यावर शॉपिंगही मनसोक्त करता येते. आकाश कंदील, नक्षीदार रांगोळी आणि स्वादिष्ट फराळा बनविण्यापासून ते त्यावर ताव मारण्यापर्यंत सारी कामे दिवाळी प्रेमी अगदी मनलावून करतात. कुठल्याही आनंदाची धम्माल डबल होते, जेव्हा सारेजण एकत्र येतात आणि दिवाळीतही जंगी जागरणं आणि पार्ट्यांचे फड रंगतात!

  1. पहिली अंघोळ

सुट्टीच्या दिवशी सकाळी ९ च्या आधी न उठणारे, दिवाळीच्या पहिल्या अंघोळीसाठी उत्साहाने ब्रम्हमुहूर्तावर उठतात. घरभर पसरलेला उटण्याचा सुगंध, नव्या को-या कपड्यांची रंगत, देवदर्शन व एकत्र बसून घेतलेला फराळाचा आस्वाद! अशी स्वच्छ सकाळ घेऊन येणारी दिवाळी आळसाळा कुठच्याकुठे पळवून लावते.

  1. मनोरंजन

दिवाळीच्या निमित्ताने रसिकमनही तृप्त होतं. दिवाळी अंक व दिवाळी पहाट सारखी मेजवानी सणाची लज्जत आणखी वाढवते. वर्षभर कितीही विशेषांक निघाले, तरी दिवाळी अंकांची आतुरतेने वाट पहाणे निराळेच!

  1. फाटाके

दिवाळी आणि फटाके यांचे नाते पूर्वीइतके दृढ राहिले नाही, ही बाब सुखदायक आहेच. दिवाळीत फटाके वाजवणे कमी झालेले असले, तरी पुर्णपणे बंद झालेले नाही. पर्यावरणप्रेमींची वाढती संख्या पाहता तेही शक्य होईल. तोपर्यंत फटाके वाजवणा-यांसाठी दिवाळी आवडण्यामागे ‘फटाके’ हे ही एक कारण असेल.

वरील कारणांपैकी, तुम्हाला दिवाळी हा सण कुठल्या कारणांमुळे आवडतो ते नक्की लिहा ब्लॉगखालील कमेन्टबॉक्समध्ये! पाहू तरी मैत्रिणींनी दिवाळी का प्रिय आहे ते..!

More Articles
Designed and Developed by SocioSquares