Nosepins- banner

तुम्हाला आवडतील या हटके नोजपिन्स!

मराठमोळा पेहराव नथीशिवाय पूर्ण होत नाही व हल्ली नोजपिन्सशिवाय ट्रेंडी लूक येत नाही. नाक टोचलेले नसले, तरी ही क्लीपची नोजपिन सहज घालता येते. म्हणूनच, कदाचित ती तरुणाईच्या पसंतीस उतरली आहे. तुमच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये असाव्यात अशा काही आकर्षक नोजपिन्स डिझाईन्स तुमच्यासाठी,

१. खड्यांची नजाकत केव्हाही शोभूनच दिसते. बारीकशा नोजपिनवर रोवलेल्या खंड्यांची एकतरी नोजपिन संग्रही असायलाच हवी.

new nosepins (1)

 •  २.  जुन्या कॉईनचे डिझाईन या नोजपिनला निराळेच रुपडे देतेय.
 • Nosepins banner (4)

 • ३. बारीकशी चंद्रकोर कपाळावर टिकली म्हणून लावताच चेह-याचा लूक क्षणात किती पालटतो. तशाच चंद्रकोरीच्या आकारातील नोजपिनही देखणी दिसणार यात दुमत बिलकूल नाही.
 • new nosepins (3)

 • ४. गोलाकार आकारात काळ्यारंगाच्या सहाय्याने दिलेला रफ लूक, सध्या ट्रेंडी आहे.

Nosepins banner (6)

 • ५. सोनेरी रंगातील ही वळणदार नोजपिन जिन्स कुर्तीवर नक्कीच शोभून दिसेल!

Nosepins banner (7)

 • ६. तारेची वळणे घेत, अर्धगोलाकार रेषेत बांधलेले बारीक मणी व नोजपिनचा तांबूस रंग आहे ना मस्त!
 • Nosepins banner (1)

 • ७. दोन लहान मण्यांची जोड असलेली ही नोजक्लिप हलकीशी नथीसारखी भासते.
 • Nosepins banner (2)
 • फॅशनसोबत बदलायचं, तर नवखी नखरेल फॅशन जाणून घ्यायलाच हवी. ऑनलाईन शॉपिंग करण्यात तुम्ही नक्कीच माहीर असाल, वरील नोजपिन्सच्या डिझाईन्सही तुम्हाला अशाच घरबसल्या इंटरनेट शॉपिंगमध्ये मिळू शकतील. कसा वाटली आजची फॅशनेबल माहिती? कळवा तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेन्टबॉक्समध्ये!

Image source- pinterest

More Articles
Designed and Developed by SocioSquares