FOODY (1)

तुम्ही अन्नघटक वाचवता का?

निरोगी आरोग्यासाठी डाएट, व्यायाम, योगा हे महत्त्वाचे आहेत, मात्र याहून अधिक गरजेचे आहे रोजच्या आहारातून पोषक घटकांचे सेवन होणे. वयोमानानुसार आहार बदलतो आणि आहारानुसार ठरते निरोगी आरोग्य! पौष्टिक पदार्थांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असतात पालेभाज्या. या भाज्या शिजवताना त्यातील पोषक घटकांची योग्य ती काळजी घेतली, तरच त्यांचा शरीराला फायदा होतो. अन्न शिजवताना त्यातील जीवनसत्त्वांचा नाश होऊ नये, म्हणून काही टिप्स आज जाणून घेणार आहोत.

  • भात शिजविण्याआधी तांदूळ फार चोळून धुवू नयेत. तांदळावरील पावडर निघणे आवश्यक आहेच, त्यासाठी साधारण दोन ते तीन वेळा तांदूळ हलक्या हातांनी धुणे पुरसे ठरते.
  • भाज्या वाफेवर शिजवल्यास त्यातील पौष्टिक घटक टिकून रहातात, तसेच पालेभाज्या शक्यतो लोखंडी कढईत शिजवाव्यात.
  • कोथिंबीर, कांदा किंवा भाज्या भाजी करण्याच्या काहीवेळ आधीच कापून घ्याव्यात. काही तास आधी किंवा आदल्या दिवशी असे जिन्नस कापून ठेवल्यास त्यातील आवश्यक घटकांचा नाहिशी होतात.
  • पापड, कुरडया तळण्यासाठी वापरलेले तेल भाजी किंवा आमटीसाठी वापरु नये.
  • मुळा, गाजर, बीट, काकडी, टॉमेटो, कोबी यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असल्याने त्या कच्च्या खाणेच उत्तम! यासाठी सॅलेड्सची विविध कॉम्बिनेशन्स नक्की ट्राय करता येतील.
  • अन्नपदार्थ शिजवताना खाण्याचा सोडा कधीही वापरु नये.
  • चिंच, आमसूल, हळद असे शरीराला उपयुक्त असणारे जिन्नस विविध रेसिपीजमध्ये अवश्य वापरावेत.

आता या टिप्स, रोज जेवण बनवताना आजमावून पाहा. यामुळे, शरीरात विशिष्ट जीवनसत्त्वांची कमी असण्याची समस्या उद्भवणार नाही. घरातील लहान थोर सा-यांचेच आरोग्य निरोगी राहील.

More Articles
Designed and Developed by SocioSquares