eyee (2)

तुम्ही आयलाइनर वापरत असाल, हे वाचाच…

डोळ्यांना देखणे रुपडे बहाल करणा-या अनेक प्रसाधनांपैकी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे आयलाइनर! काही काळ डोळ्यांना काजळ लावणा-या मुली जितक्या संख्येनं दिसत. तशाच आता आयलाइनर लावलेल्या मुली सर्रास दिसू लागल्यात. अगदी शाळकरी चिमुकल्यांनी डोळ्यांच्या कडेला आयलाइनरची रेखीव रेघ ओढण्याचा मोघ आवरत नाही. त्यातही अनेक प्रकार आहेत. आय पेन्सिल, लिक्विड लायनर, क्रिम लायनर, जेल लायनर, लोह्र लायनर सोयीनूसार ज्याला जो रुचेल, पटेल तो ते निवडतो. मात्र, ते वापरताना काही समान काळजीचे मुद्दे नजरेआड करुन चालायचे नाहीत.

  1. पापणीच्या आतील कडेवर आयलाइनर लावल्यास कॉर्नियाचे संरक्षण करणा-या द्रवाचे कार्य सुरळीत घडत नाही. आयलाइनरच्या पेन्सिल किंवा ब्रशच्या टोकावरील जंतूंचा थेट डोळ्यांशी संपर्क आल्याने मुख्यत्वे कॉन्टॅक लेन्सेस वापरणा-यांसाठी किंवा अधिक संवेदनशील डोळ्यांसाठी हे हानिकारक असते.
  2. ग्लिटरचा समावेश असणारी सौंदर्य प्रसाधने शक्यतो टाळावीत. ग्लिटरयुक्त प्रसाधने बाकी चेह-यावर जरी लावली, तरी नकळतपणे त्यातील ग्लिटर डोळ्यांत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांची जळजळ होऊन ते लाल होतात किंवा दुखू लागता.
  3. शक्यतो तीन महिन्यांत आयलाइनर बदलायला हवे. ते वापरण्याची मर्यादा अधिक काळ असली. तरी तीन महिन्यांच्या वापरानंतर खबरदारी म्हणून नवे आयलाइनर वापरणे सोयीचे ठरेल.
  4. दररोज आयलाइनरचा वापर करणा-या मुलींनी एखाद दिवस जरी आयलाइनर लावले नाही, तर त्या आजारी दिसतात अथवा त्यांच्या चेह-यावर नेहमीच्या टवटवीतपणाची कमी जाणवते.
  5. सुंदर दिसण्यासाठी आयलाइनरचा वापर करणे चुकीचे बिलकूल नाही. मात्र, त्याचा नियमित वापर डोळ्यांसाठी हानिकारक ठरतो. डोळ्यांजवळील त्वचा कोरडी होते. तसेच, आयलाइनरचे घटक डोळ्यांत जातात, बराच काळ तसेच डोळ्यांच्या बाह्य पटलावर फिरत रहातात. त्यातील रसायनांचा डोळ्यांशी थेट संपर्क येऊन संसर्ग होण्याशी शक्यत असते.
  6. डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा, पापण्या, भुवया हा संपूर्ण भागालाही तितकेच जपावे लागत असल्याने, लाइनर पुसण्यासाठी क्लिनझर नाहितर मॉईच्छराईझर रोज तिथे लावले जाते. ज्यामुळे, ती काळवंडते. त्यावर सुरकत्या येऊन अधिक नाजूक बनते.

डोळ्यांसारख्या सर्वोत्तम नाजूक अवयवाबाबत कुठलीही जोखीम पत्करणे धोक्याचे ठरते. म्हणूनच, क्षणार्धात संपूर्ण चेह-याचे रुपडे सुंदर करण्याची ताकद आयलाइनरमध्ये असली, तरी त्याचा वापर जरा जपूनच करायला हवा.

More Articles
Designed and Developed by SocioSquares