mehendi banner

नव्याको-या मेहंदी डिझाईन्स!

नटण्या मुरडण्याची हौस कुणाला नसते? कुठल्याही समारंभाला जाताना आपण छान दिसायला हवं, याविचाराने ट्रेंडी फॅशनचा अभ्यास सुरु होतो. मग, साजेशी हेअर स्टाईल, ज्वेलरी सा-यातच आपल्याला काहीतरी हटके हवं असतं. पण फॅशन कितीही मॉर्डन झाली, तरी मेहंदीची क्रेझ कधीच कमी होणार नाही. कारण “मेहंदी तो सबपे जजती है|”

पारंपारिक असो किंवा इंडो वेस्टर्न लूक, छान रंगलेली नक्षीदार मेहंदी दोन्हीची शोभा वाढवते. अशीच काही डिझाईन्स खास घेऊन आलोय तुमच्यासाठी, नक्की ट्राय करुन पाहा.

तरुणाईत हिट असणारी सध्याच्या ट्रेंडी डिझाईन्स पैकी ही एक! मोठी वळणे, कुयरीतील सुटसुटीतपणा व मधूनच भौमितिक आकृत्यांची पेरण, यामुळे डीझाईनला येणारा लयदारपणा शोभून दिसतो.

mehendi 6 (1)

ज्वेलरीचा लूक देणारे हे डिझाईन साधारण फिंगर ब्रेसलेट सारखे दिसते. नेल पॉलिशचा उठावही कायम राहातो. ज्या बोटावर मेहंदी असेल, त्या बोटावरील नखावर मेहंदीसारेखेच बारीक नेल आर्ट केल्यास निराळा लूक नक्कीच येईल.

mehendi 5 (2)

 

फक्त तळहातावर लहानशी मेहंदी काढायची असल्यास, तितकेच आटोपशीर डिझाईनही हवे!

 

mehendi 2

mehendi 3

पायावर बारीक नक्षीदार डिझाईन शोभून दिसते. मुख्यत्वे बोटांजवळ मेहंदीने गडद न करता खालील फोटोत दाखविल्याप्रमाणे वळणादार डिझाईन काढता येईल.

mehendi 1

बोटांना न झाकणारे आणखी एक पायावरील मेहंदीचे डिझाईन!

mehendi 4

पारंपारिक प्रकारातील किचकट नक्षीकामाने सजलेले हे डिझाईन प्रत्येक मेहंदी प्रेमीस कायमच भुरळ पाडत आले आहे.

mehendi 7 (1)

 

मैत्रिणींनो, पुढीलवेळी मेहंदी काढताना हा ब्लॉग नक्की लक्षात ठेवा व मेहंदी काढणारीला तुमच्या पसंतीची मेहंदी काढायला सांगा याच डिझाईन्स दाखवून! तुमच्या प्रतिक्रिया कळवत रहा व आणखी कुठल्या विषयांवरील माहिती जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक आहात तेही लिहा खालील कमेन्टबॉक्समध्ये,

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares