HAIR CUTTING TIME (1)

असा निवडा चेह-याला साजेसा ‘हेअर कट’!

चेह-याच्या सौंदर्यात भर पाडणारा महत्त्वाचा घटक म्हणजे हेअर कट! संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला आकर्षक लूक देण्यासाठी विचारपूर्वक केसरचनेची निवड करणे, म्हणूनच आवश्यक ठरते. चेह-याची ठेवण किंवा केसांचा पोत लक्षात घेऊन योग्य हेअर कट निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा हा लेख तुम्हा मैत्रिणींसाठी!
१. लांबसडक केसांसाठी हेअर कट शोधत असाल, तर लेअर्स हा एक उत्तम पर्याय असून; यामुळे केसांची लांबी फार कमी न करता
आकर्षक लूक मिळू शकतो.
२. लांब केसांसाठी ‘कर्ली’ किंवा ‘पमिंग’ करण्याचा पर्याय उपलब्ध असून, एखाद्या सोहळ्यासाठी ही हेअर स्टाईल छान लूक देईल.
३. केस कुरळे व विरळ असल्यास यू आकारात कापावेत तसेच, रोलर सेटिंग करुन फुलवून घ्यावेत.
४. पातळ व सरळ केसांच्या टोकांना स्टेप्स देऊन केसांना दाटसर करण्याचा प्रयत्न करावा.
५. गोलाकार चेह-याभोवती कमी केस ठेवावेत, यामुळे चेह-याला अंडाकृती आकार मिळण्यास मदत होते, तसेच एका बाजूला तिरप्या फ्लिक्स ठेवल्यास उठावदार दिसते.
६. साधारण उभट चेहरा असल्यास हनुवटीपर्यंत बॉबकट ठेवावा, विशेषत: कुरळे केस असल्यास हा हेअर कट अधिक शोभून दिसले.
७. बदामी आकाराच्या चेह-यासाठी लांब केस व कपाळावर काही बटा ठेवाव्यात, अशाप्रकारे कपाळाजवळील केसांची लांबी कमी ठेवल्यास उठावदार दिसेल.
८. मधला भांग पाडण्याची सवय असल्यास हेअर कट देताना तिरपा भांग द्यावा, या थोड्याशा बदलाने देखील चेह-याच्या ठेवणीत फार फरक पडलेला दिसेल.
तुमच्या केसांचा पोत लक्षात घेऊन योग्य हेअर कटची निवड करा, केस कोरडे आहेत की तेलकट, ते सरळ आहेत की कुरळे अशी योग्य विभागणी करुन त्यांना छानसा कट द्या. मात्र, यासोबत केसांची निगा राखणे तितकेच अत्यावश्यक आहे. केसांना आठवड्यातून एकदा तरी तेल लावावे, तर महिन्यातून किमान दोनदा कंडिशनर वापरावे. अशी नियमित काळजी घेतल्यास हेअर कट देणे सोप्पे जाईल व बळकट केसांना विविध स्टाईल देत ट्रेंडी लूक देणेही शक्य होईल.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares